भूमिका अभिनय - Role Playing

भूमिका अभिनय - Role Playing


भाषा अध्यापनाचे अविभाज्य अंग भूमिका अभिनय होय. भाषेच्या शिक्षकात कलावंताचे गुण असले पाहिजे. तो एक चांगला नट असला पाहिजे. शिक्षकांचे वागणे बोलणे, लिहिणे-वाचणे इतके परिणामकारक असले पाहिजे की अधिकांश कौशल्य त्यांच्या वर्तन-कृतीतून विद्यार्थ्यात संक्रमित व्हावे. भावपूर्ण वाचन, स्पष्ट उच्चार, मुद्राभिनय, आवाजातील चढउतार, हालचाल हावभाव या बाबतीत परीपूर्ण कौशल्य भाषा शिक्षकात असावी. नाट्य वाचन, कविता वाचन, कथा आदर्श वाचन शिक्षकाने प्रभावीपणे करावे. 


भूमिका अभिनय पद्धतीचा अर्थ :


“एखादा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी किंवा पाठातील मध्यवर्ती कल्पना विद्यार्थ्यांच्या मनावर ठसविण्यासाठी शिक्षक आपल्या विवेचनाला जेंव्हा भूमिका अभिनयाची जोड देतो, तेव्हा त्या पद्धतीला भूमिका अभिनय पद्धती असे म्हणतात." 


भूमिका अभिनय पद्धती :


भूमिका अभिनय पद्धतीत भूमिका व अभिनय या दोन तंत्राचा समावेश असतो. याला इंग्रजीत • Role Playing' असे म्हणतात. नाटकाप्रमाणे भूमिका अभिनयात लिखित संवाद वा तयार संहिता नसते. भूमिकाभिनयात उत्स्फूर्त व समायोजित नाट्यीकरण असते. दुसऱ्याची भूमिका करणे म्हणजे भूमिकाभिनय करणे होय. या पद्धतीचा अध्ययन-अध्यापनात वापर करून अनेक प्रसंग जिवंत निर्माण करता येतात. 'भातुकलीचा खेळ' व 'विद्यार्थी दिन' ही भूमिकाभिनयाचेच उदाहरण होय. इतिहासातील विविध प्रसंग, मराठीतील कथानक याची निवड भूमिका अभिनयाकरिता करता येईल. या पद्धतीचा योग्य वापर करून अध्ययन-अध्यापनाचे कार्य शिक्षकाला प्रभावी रीतीने करता येते. या पद्धतीत संवाद व अभिनयाला विशेष महत्त्व असते.