वाचनाचे प्रकार - Types of reading
वाचनाचे प्रकार - Types of reading
वाचनाचे त्याच्या रीतीवरून दोन प्रकार पडतात.
1. प्रकटवाचन
2. मूकवाचन
अ) प्रकटवाचन
प्रकटवाचन ही एक कला आहे. प्रकटवाचन हे नेहमी दुसऱ्यांसाठी केले जाते. त्यामुळे प्रकटवाचन सूव्यवस्थित, स्पष्ट व शुद्ध असावे लागते. त्याचप्रमाणे ते प्रभावी असावे लागते. साधारणपणे, गद्यपाठ, कविता, नाट्य, वृत्त इत्यादींचे प्रकटवाचन केले जाते. चांगल्या प्रकटवाचनासाठी निकष खालीलप्रमाणे सांगता येतात.
1. अक्षरांचे, शब्दांचे स्पष्ट व शुद्ध उच्चार करता येणे..
2. आवाजात सहजता असणे, योग्य चढ-उतार असणे.
3. योग्य विरामचिन्हासहित वाचने.
4. सुयोग्य गतीने वाचन येणे.
5. लेखनातील भावनेशी समरस होऊन वाचता येणे व त्या भावना वाचनात प्रतिबिंबित करता येणे.
आ) मूकवाचन :
अक्षरांचे डोळयांद्वारे ग्रहण करून मेंदूद्वारे त्याचे अर्थग्रहण करणे, उच्चार करतांना मनातल्या मनात वाचणे याला मूकवाचन म्हणतात. मूकवाचन हे
दुसऱ्यांसाठी नसून स्वत:साठी केले जाते. त्यामुळे मूकवाचनातून अर्थग्रहण करण्याची जबाबदारी स्वतःची असते. वाचन, अवांतर वाचन, विस्तृत वाचन हे सुद्धा मूकवाचनच असते. चांगल्या मूकवाचनाचे निकष पुढीलप्रमाणे सांगता येतात.
1. एकाच दृष्टीत जास्तीत जास्त शब्द सामावून शीघ्र गतीने वाचता येणे.
2. वाक्यातील विविध शब्दांचा संदर्भानुसार असणारा अर्थ चटकन लक्षात घेणे.
3. शब्दाचा वाच्यार्थ, लक्षार्थ व ध्वन्यार्थ लक्षात येणे.
4. एका परिच्छेदाचा दुसऱ्या परिच्छेदाशी असणारा संबंध लक्षात ठेवून वाचता येणे.
5. वाचत असताना उताऱ्यातील प्रमुख विचारांची, कल्पनांची, भावनांची नोंद मनात करता येणे.
वार्तालाप में शामिल हों