मराठीच्या प्रचलित पाठ्यपुस्तकाचे आदर्श पाठ्यपुस्तकांच्या निकषानुसार परीक्षण कुमारभारती इयत्ता 10 वी - Evaluation of popular text book of Marathi according to standard textbook criteria Kumar Bharti Class 10

मराठीच्या प्रचलित पाठ्यपुस्तकाचे आदर्श पाठ्यपुस्तकांच्या निकषानुसार परीक्षण कुमारभारती इयत्ता 10 वी - Evaluation of popular text book of Marathi according to standard textbook criteria Kumar Bharti Class 10


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी मराठी प्रथम भाषा यासाठी 08 वीच्या स्तरावर बालभारती या पाठ्यपुस्तकाची निर्मिती करण्यात आली. या पाठ्यपुस्तकाचे सखोल वाचन केल्यानंतर आदर्श पाठ्यपुस्तकाच्या निकषानुसार खालील बाबी क्रमवार लक्षात घेण्यासारख्या आढळून आल्यात. बहिरंग


1) पाठ्यपुस्तकाचा आकार


बालभारती या पाठ्यपुस्तकाचा आकार, लांबी, रुंदी, जाडी पुस्तक हाताळण्याच्या दृष्टिने सोयीची आहे. आकाराकडे पाहाताच ते आकर्षक वाटते. 


2) पाठ्यपुस्तकाचे मुखपृष्ठ -


पाठ्यपुस्तकाच्या मुखपृष्ठावर लहान बालके पुस्तकाचे अवलोकन करतांना दिसत आहे. अभ्यासात रुची वाढविणारे मुखपृष्ठ आहे. बालभारती या पाठ्यपुस्तकावर लहान बालकांचे चित्र आकर्षक व लक्षवेधक आहे. लहान बालकाचे अध्ययनरत चित्र पाठ्यपुस्तकाच्या अंतरंगाची चिकित्सा वाढविणारी आहे. 


3) पाठ्यपुस्तकाचा कागद


पाठ्यपुस्तकाचा कागद पांढरा शुभ्र आहे. पाठ्यपुस्तक सतत हाताळावे लागत असल्याने कागद मजबूत व टिकाऊ आहे.. 08 वीची मुले लहान असल्याने पाठ्यपुस्तक हाताळाण्यास योग्य आहे. त्यामुळेच कदाचित पाठ्यपुस्तकाचा कागद उच्च प्रतीचा वापरला आहे.


4) पुस्तकाचा टाईप आणि सुबक छपाई


अक्षराचा टाईप विद्यार्थ्याच्या वयानुसारच आहे. पुस्तकातील पानांची संख्या अक्षरांचा आकार, ओळींची संख्या, प्रत्येक ओळीतील अंतर दोन शब्दातील अंतर पानाच्या चारही बाजूस सोडावयाचा समास, यादृष्टिने पाठ्यपुस्तक योग्य आहे. पुस्तकात आशययुक्त रंगीत चित्र रेखाटली आहे.


5) पाठ्यपुस्तकाची बांधणी - पाठ्यपुस्तकाची बांधणी मात्र मजबूत व टिकाऊ आहे. पुस्तकाकरिता वापरलेला कागद उच्च प्रतीचा आहे.


6) पाठ्यपुस्तकाची किमत -


सर्व स्तरातील विद्यार्थ्याना पाठ्यपुस्तक उपलब्ध व्हावे सर्व शिक्षा अभियानांतर्गत विनामूल्य वितरणास उपलब्ध केलेले आहे. पाठ्यपुस्तक प्रत्येक विद्यार्थ्याजवळ असणे अनिवार्य आहे.


तात्पर्य, इयत्ता 8 वी करिता निर्धारित बालभारती' या पाठ्यपुस्तकाच्या बहिरंगाचा विचार करता बहिरंग निश्चितच आकर्षक आहे. अंतरंगात शिरल्यानंतर प्रथमच लक्ष वेधून घेते ती भारतीय संविधानाची उद्देशिका. उद्देशिकेतून भारतीय जनतेच्या आशा आकांक्षा प्रतिबिंबित होते. नंतरच्या पृष्ठावर प्रतिज्ञा मुद्रित केली आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांची प्रस्तावना दिलेली आहे. शिक्षक व पालकाकरिता भाषेची सर्वसामान्य उद्दिष्टये दिलेली आहे. गद्य व पद्य विभागात वर्गीकृत केलेली अनुक्रमणिका दिलेली आहे. तर महत्त्वाच्या बाबी पुढीलप्रमाणे


1) अभ्यासक्रम डोळ्यासमोर ठेवून तयार केलेला आराखडा -


पाठ्यपुस्तक तयार करतांना पाठांची संख्या, पाठांचा क्रम, पृष्टसंख्या, इ. चा आराखडा नियोजनपूर्वक केल्या गेला आहे. भाषेतील विविध विचारप्रकार याचा परिचय विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी गद्य व पद्य साहित्याचा अंतर्भाव प्रचलित पाठ्यपुस्तकात केला आहे. 


2) वेच्यांची निवड -


मराठी साहित्याचा विविधांगी व प्रातिनिधिक स्वरूपात परिचय करणे, विद्यार्थ्यांमध्ये वाङमयीन अभिरूची निर्माण करणे, विद्यार्थ्यांचे भावविश्व संपन्न करणे, विद्यार्थ्यात निकोप जीवनदृष्टी विकसित करणे, सामाजिक जाणीव विकसित करणे, आपली मातृभाषा समाज व राष्ट्र यांच्या विषयी अभिमान वृद्धिंगत करणे, नैतिक संस्कार करणे अशा सर्वंकषदृष्टिने इयत्ता 8 वी करिता पाठ्यपुस्तकातील गद्य पद्याची निवड करण्यात आली आहे. 


3) पाठ्यपुस्तकातील पाठांची मांडणी -


पाठ्यपुस्तकातील पाठांची मांडणी करतांना कालानुक्रम पाळला आहे. वैचारिक निबंध, आत्मचरित्र रूपककथा, व्यक्तिचित्रे, विचारधन, दलितकथा, ललितलेख,

लघुकथा, विचारधन असा कालानुक्रम पाळला आहे. काव्याच्या संदर्भात देखील संत तुकाराम, जनाबाई यांची संतवाणी, महात्मा फुलेचे अखंड काव्य, राष्ट्रभक्ती, निसर्गकाव्यापासून इंदिरा संत यांच्या पंचारती पर्यन्त कवितांचा योग्य क्रम सांभाळला गेला आहे. 


4) पाठ्यपुस्तकातील वेच्यांची भाषा


पाठ्यपुस्ताकतील पाठ्यांशाची भाषा विद्यार्थ्यांच्या वयानुसार आहे. भाषा सहज, सोपी व प्रभावी आहे. पाठातील आशय जीवनाशी संबंधित मांडल्यास आकलनास सोपा जाईल. काही कवितांना योग्य चाली लावून रसास्वाद निर्माण करता येईल. शिक्षकाने पाठ वा कवितेचे अध्यापन करतांना स्वतः त्याचा संदर्भ अभ्यासला तर विद्यार्थ्यापर्यंत आशय पोहोचविण्यास तो सक्षम होईल. 


5) पाठ्यपुस्तकातील चित्रे व आकृत्या -


पाठ्यपुस्तकातील चित्रे व आकृत्या समाविष्ट आहे. आशयगर्भित चित्रे दिलेली आहे. वाङमयीन जाणीव निर्माण होण्यासाठी कोणत्या अनुभावातून ती कलाकृती सादर केली याचे दर्पणातून वाङमयीन अभिरूची व अभिवृती वाढण्यास मदतच होईल. 


6) पाठ्यपुस्तकातील स्वाध्याय, व्याकरण, रसास्वाद


विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या दृष्टिने स्वाध्याय प्रश्न प्रत्येक पाठाच्या शेवटी दिलेले आहेत. तसेच स्वाध्याय प्रश्नाशिवाय कृतीशिलतेला वाव मिळावा म्हणून उपक्रमावरही भर दिला आहे. व्याकरणाचा अभ्यासही सोबत सोबत केलेला आहे. भाषा व्याकरणशुद्ध असावी हाही नियम पाळलेला आहे. विविध काव्य व साहित्य प्रकारातून विद्यार्थ्यांची रसास्वाद क्षमता विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे.


तात्पर्य, बहिरंग व अंतरंगाच्या दृष्टिकोणातून सर्वांगाने विचार करता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी मराठी प्रथम भाषा यासाठी 08 वीच्या स्तरावर बालभारती या पाठ्य पुस्तकाची उत्कृष्ट निर्मिती केली आहे. पाठ्य पुस्तकांच्या शेवटी शब्दार्थ दिलेले असल्याने शब्दाचा अर्थ स्पष्ट होण्यास निश्चित मदत होईल.

 -