वाचन विकासासाठी उपक्रम (अध्ययन अनुभव) - Activities for reading development (study experience)

वाचन विकासासाठी उपक्रम (अध्ययन अनुभव) - Activities for reading development (study experience)


वाचन क्षेत्राच्या विकासासाठी खालीलप्रमाणे उपक्रम राबवता येतात.


1. शब्दपट्टया वाक्यपट्टया तयार करून त्यावर अक्षर, शब्द व वाक्यांचे वाचन करून घ्यावे.


2. शब्दचित्र मालिका व भित्तिपत्रके तयार करून त्यावर विद्यार्थ्यांचे वाचन घेणे.


3. वर्तमानपत्रातील निवडक बातम्यांचे परिपाठात वाचन करून घेणे. 


4. कविता, गाणी व छोटया गोष्टींचे विद्यार्थ्यांकडून मोठ्याने वाचन करून घेणे..


5. परिसरातील दुकानावरील पाटया वाचून त्यांची यादी करण्यास सांगणे. 


6. विद्यार्थ्यांच्या गृहपाठांच्या वह्यांची आदलाबदल करून त्यांचे वाचन करून घेणे.


7. कथावाचन, नाटयवाचन, निबंधवाचन, कविता वाचन हे उपक्रम घेणे.


8. सूचना फलक, वार्ता फलक, वर्गफळा यांचा वापर कौशल्या विकासासाठी करून घेणे. 


9. विद्यार्थ्यांकडून मूकवाचन करून घेणे.


10. वर्तमानपत्रे, विद्यार्थ्यांसाठी तयार केलेली नियतकालिके यांचे अवांतर वाचन करून घेणे