लेखन विकासासाठी उपक्रम (अध्ययन अनुभव) - Activities for Writing Development (Study Experience)
लेखन विकासासाठी उपक्रम (अध्ययन अनुभव) - Activities for Writing Development (Study Experience)
इयत्ता 1 ली व 2 री
1. विद्यार्थ्यांकडून उभी-आडवी रेषा, अर्धवर्तुळ, वर्तुळ या मुळाक्षरांच्या अवयवांचा सराव
2. करून घेणे.
3. विद्यार्थ्यांच्या वाचनात येणारी मुळाक्षरे, जोडाक्षरे विद्यार्थ्याकडून लिहून घेणे.
4. विद्यार्थ्यांकडून मुळाक्षरे, बाराखडी, जोडाक्षरे यांचे श्रुतलेखन करून घेणे.
5. विद्यार्थ्यांकडून सोपी शब्द व सोपी वाक्यं यांचे दृकलेखन करून घेणे.
6. शिक्षकाने स्वतः फळ्यावर सुलेखन करून ते विद्यार्थ्यांकडून करून घेणे.
7. विद्यार्थ्यांकडून सोपी शब्द व सोपी वाक्यं यांचे श्रुतलेखन करून घेणे.
इयत्ता 3 री ते 4 थी:
1. छोटे विषय देऊन त्यावर निबंध लिहून घेणे.
2. विद्यार्थ्यांकडून न पाहता सुलेखन करून घेणे.
3. विद्यार्थ्याकडून विरामचिन्हासह लेखन करून घेणे.
4. विद्यार्थ्यांकडून परिच्छेद लेखन करून घेणे.
इयत्ता 5 वी ते 8 वी:
1. विद्यार्थ्यांकडून शुद्धलेखन करून घेणे.
2. विद्यार्थ्यांकडून पत्रलेखनाच्या प्रकारांचे लेखन करून घेणे.
3. विद्यार्थ्यांकडून वर्णनात्मक, कल्पनाप्रधान व आत्मकथनपर निबंध लेखन करून
4. विद्यार्थ्यांकडून मुद्यांच्या आधारे कथालेखन करून घेणे.
5. विद्यार्थ्यांकडून सारांश लेखन, कल्पनाविस्तार लेखन करून घेणे,
6. शाळेमध्ये हस्ताक्षर, निबंध, शुद्धलेखन स्पर्धा आयोजित करणे.
वार्तालाप में शामिल हों