बुद्धीमंथन तंत्राचे गुणदोष पुढीलप्रमाणे सांगता येतील - The advantages and disadvantages of brainstorming techniques can be explained as follows

बुद्धीमंथन तंत्राचे गुणदोष पुढीलप्रमाणे सांगता येतील - The advantages and disadvantages of brainstorming techniques can be explained as follows


गुण :


1. बुद्धीमंथन तंत्र सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे.


2. या तंत्राला विशिष्ट वर्गाचे बंधन नसते.


3. बुद्धीमंथन तंत्रामध्ये सर्वाना आपले विचार व्यक्त करण्याची व इतरांचे विचार ऐकण्याची संधी प्राप्त होते.


4. एखाद्या समस्येवर सांगोपांग चर्चा करता येते. 


5. विद्यार्थ्यांना सखोल विचार करण्याची सवय लागते.


6. विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना प्राप्त होते.


7. वर्गात खेळीमेळीच्या वातावरणातून उत्साह वाढून निरसता कमी होते.


दोष:


1. बुद्धीमंथन तंत्र पाठ्यांशातील विचार, माहिती सांगण्यासाठी उपयुक्त ठरत नाही. 


2. या तंत्राची यशस्विता नियोजनावर अवलंबून आहे.


3. नेतृत्व कौशल्यावर चर्चेचे यशापयश अवलंबून असते. 


4. चर्चेच्या नोंदीमुळे चर्चेस संथगती येते.


5. तंत्राच्या यशस्वितेकरिता अचूक व मुद्देसूद विचार मांडण्याचे तंत्र विद्यार्थ्यांना अवगत नसल्यास सातत्यपूर्ण चर्चेस बाधा निर्माण होते.