दिल्या जातात. सहेतूक श्रवण -are given in the following. Reasonable hearing

दिल्या जातात. सहेतूक श्रवण -are given in the following. Reasonable hearing


एका संशोधनात असे दिसून आले की, विद्यार्थ्यांचा एकूण शालेय वेळेपैकी 45% वेळ ऐकण्यात, 30% बोलण्यात, 16% वाचण्यात व 9% लिहिण्यात जातो. याचा अर्थ एकूण शालेय वेळेपैकी जवळपास अर्धा वेळ विद्यार्थी फक्त श्रवण करतात. हे सर्व श्रवण हेतुपूर्वक केले गेले तर विद्यार्थ्यांच्या श्रवण सामर्थ्यात वाढ होईल. श्रवणाचे अनेक हेतू असतात. उदा. गाणी ऐकण्यापाठीमागे शब्दोच्चार, आवाजातील चढ उतार, नादमाधूर्य या बाबी लक्षात याव्यात हा हेतू असतो. नवीन अपरिचित शब्दांच्या श्रवणातून शब्दसंपत्तीचा विकास व्हावा हा हेतू असतो. गोष्टी, कथा यांच्या श्रवणातून त्यातील बोध आकलन व्हावा हा हेतू असतो. वर्णन, कथाकथन, वादविवाद इत्यादी भाषणांचे प्रकार विद्यार्थ्यांना श्रवण करायला लावण्यापाठीमागे विद्यार्थ्यांनाही ते भाषणाचे प्रकार करता यावे हा हेतू असतो. वर्गाध्यापनात कथन, स्पष्टीकरण या शिक्षक कृतीच्या श्रवणातून विद्यार्थ्यांना आशयाचे आकलन व्हावे हा हेतू असतो. इतकेच नव्हे तर लहान मुलाने जे ऐकले त्याचे अनुकरण करून बोलावे हा हेतू असतो. श्रवण ही भाषा अभ्यासाची पूर्वतयारी असते. त्यामुळेच ते सहेतूक असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी केलेले श्रवण सहेतूक व्हावे याची शिक्षकांनी दक्षता घेणे आवश्यक आहे.