वाचनाचे मूल्यमापन - Assessment of reading

वाचनाचे मूल्यमापन - Assessment of reading


वाचन क्षेत्रातील क्षमतांची प्राप्ती विद्यार्थ्यांना कितपत झाली याचे मूल्यमापन तोंडी, निरीक्षण व नोंदी ठेवून करता येते. 


i. तोंडी मूल्यमापन : विद्यार्थ्यांला पुढील कृती करण्यास सांगून मूल्यमापन करणे.


1. शब्द, वाक्य यांचे विद्यार्थांकडून वाचन करून घेणे.


2. पाठांचे. कवितेचे प्रकट वाचन करून घेणे.


3. विद्यार्थ्यांना ठराविक मूकवाचन देऊन त्यावर प्रश्न विचारणे.


या प्रकारच्या मूल्यमापनातून उच्चार, चढ-उतार, विराम, गती, आकलन इत्यादी बाबींचे मूल्यमापन करता येते.


1. निरीक्षण व नोंदी:


विद्यार्थ्यांचे वाचन कौशल्याच्या मूल्यमापनासाठी तोंडी मूल्यमापनाद्वारे मिळालेली माहिती, तसेच सातत्यपूर्ण निरीक्षणाद्वारे मिळालेली माहिती इत्यादीच्या नोंदी शिक्षकांकडून केल्या जातात. या नोंदीसाठी खालील पडताळा सूचीचा वापर करता येतो.