भाषण क्षमतेचे मूल्यमापन - Assessment of speech ability
भाषण क्षमतेचे मूल्यमापन - Assessment of speech ability
भाषण क्षेत्रातील क्षमता विद्यार्थ्यांनी कितपत प्राप्त केल्या हे पडताळून पाहण्यासाठी खालील साधने व तंत्रांचा वापर केला जातो.
अ) तोंडी परीक्षा :
तोंडी परीक्षेद्वारे भाषण क्षमतेचे मूल्यमापन पुढीलप्रमाणे करता येते.
i. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्याची उत्तरे घेणे.
ii. विद्यार्थ्यांकडून वर्ण, जोडाक्षरे, शब्द, वाक्य यांचे उच्चारण करून घेणे.
iii. विद्यार्थ्याला गोष्ट सांगायला लावणे, कविता म्हणायला लावणे, वर्णन करायला लावणे, नाट्य उता-यातील संवाद म्हणायला लावणे, कवितेच्या ओळी म्हणायला लावणे. वरील प्रकारचे विद्यार्थ्यांचे तोंडी परीक्षेद्वारे मूल्यमापन केल्यास विद्यार्थ्यांचे उच्चार, आघात, आवाजातील चढ-उतार, शब्दसंपत्ती, आकलन क्षमता, भाषणाचे प्रकार हाताळण्याची क्षमता इत्यादींचे मूल्यमापन करता येते.
ब) निरीक्षण व नोंदी
भाषण क्षमतेच्या मूल्यमापनासाठी तोंडी मूल्यमापनाप्रमाणे सातत्यपूर्ण निरीक्षण व नोंदींना महत्त्व आहे. तोंडी परीक्षेद्वारे भाषण क्षमतेचे केलेले मूल्यमापन, इतर वेळी सातत्यपूर्ण विद्यार्थ्यांच्या भाषण क्षमतेचे केलेले निरीक्षण, यांच्या नोंदी शिक्षकाला वेळोवेळी कराव्या लागतात. या नोंदीसाठी पडताळा सूचीचा वापर करता येतो.
वार्तालाप में शामिल हों