श्रवण विकासाचे उपक्रम (अध्ययन अनुभव) - Auditory Development Activities (Learning Experience)
श्रवण विकासाचे उपक्रम (अध्ययन अनुभव) - Auditory Development Activities (Learning Experience)
श्रवण क्षेत्रातील क्षमता विकसित करण्यासाठी व त्या क्षमता विद्यार्थ्यांला प्राप्त होण्यासाठी पुढील उपक्रमांच्या माध्यमातून अध्ययन अनुभव देता येतात.
1. बडबडगीते, गाणी, कविता गाऊन दाखविणे.
2. विद्यार्थ्यांच्या वयानुसार गोष्टी. कथा सांगणे.
3. संवाद, नाट्यउतारे यांचे प्रकटवाचन करणे.
4. संवाद, छोटी नाटय यांचे सादरीकरण करून ते विद्यार्थ्यांना श्रवण करायला लावणे,
5. विद्यार्थ्यांना हेतुपूर्वक सूचना देणे. या सूचना वैयक्तिक व सामूहिकरित्या देणे.
6. शिक्षकाने वर्णन कथन या तंत्राचा वापर श्रवण विकासासाठी करणे..
7. विद्यार्थ्यांना वर्णन, कथन, सोपी भाषणे करण्याची संधी देऊन ते इतर विद्यार्थ्यांना श्रवण करायला लावणे.
8. शिक्षकाने उताऱ्यांचे प्रभावी प्रकटवाचन करणे. एका एका विद्यार्थ्यांकडून प्रकटवाचन करून घेणे व इतर विद्यार्थ्यांना ते श्रवण करण्याची संधी देणे.
9. वादविवाद, चर्चा घडवून आणणे व ते श्रवण करण्याची संधी देणे.
10. गाण्यांच्या भेंडया, बालसभेचे आयोजन, म्हणी व वाक्प्रचार यांचा उपयोग इत्यादींचे आयोजन करणे.
11. रेडिओ, टेपरेकॉर्डर इत्यादी श्राव्य साधनांचा वापर करणे. उदा. रेडिओवरील बातम्या, बालमित्रांसाठीचे कार्यक्रम, शै. कार्यक्रम, टेपरेकॉर्डवर गाणी, कविता, नाटयछटा इत्यादींचे श्रवण करण्याची संधी देणे.
वार्तालाप में शामिल हों