वार्षिक नियोजनाचा अर्थ


" मराठी विषयाचा विशिष्ट इयत्तेनुसार पार पाडायचा जो अभ्यासक्रम असतो त्याचे योग्य घटक पाडून उपलब्ध तासिकांत त्याची विभागणी करणे म्हणजे वार्षिक नियोजन करणे होय." 


वार्षिक नियोजन करतांना घ्यावयाची दक्षता


• घटक हा वार्षिक नियोजनाचा मूलाधार आहे.


• पाठ्य पुस्तकातील सर्व पाठाची विभागणी घटकात करावी.


• प्रत्येक घटकांना किती वेळ (तासिका) द्यावा लागेल.


• उपक्रमांना किती वेळ (तासिका) द्यावा लागेल.


• मूल्यमापनाकरिता किती वेळ (तासिका) द्यावा लागेल.


• नियोजनाचे पुनर्नियोजनाकरीता किती वेळ (तासिका) द्यावा लागेल. 


• शाळेतील विषय शिक्षकांनी एकत्र चर्चा करावी.


• वार्षिक नियोजन लवचिक असावे.


• वार्षिक नियोजनात सुधारणा आणण्याकरिता सातत्याने नोंदी घ्याव्या.


• घटक, उपघटक, तासिका, मूल्यमापन व एकूण तासिका इ. चा समावेश असणारी रूपरेखा तयार करावी.


• उपघटक विचारात घेऊन उद्दिष्ट्ये (ज्ञान, आकलन, उपयोजन, अभिरुची, अभिवृत्ती, कौशल्य, रसग्रहण, मूल्यमापन इ.) निश्चित करावी.


• उपघटक, उद्दिष्ट्ये, वय, बौद्धिक क्षमता, अनुभव याचा सर्वार्थाने विचार करून अध्यापन तासिका व मूल्यमापन तासिका यानुसार वार्षिक नियोजन करावे.


• उद्दिष्टानुसार व उपघटकानुसार भारांश निश्चित करून घटकाधारित वार्षिक नियोजन करावे.