मातृभाषेचा अभ्यासक्रमाच्या तत्त्वानुसार अभ्यास

मातृभाषेचा अभ्यासक्रमाच्या तत्त्वानुसार अभ्यास

उच्च माध्यमिक स्तर इयत्ता 12 वी


महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षणमंणळाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- 1986 अनुसार बारावीच्या अभ्यासक्रमाची पुनर्रचना केलेली आहे. अभ्यासक्रम तयार झाल्यानंतर तो अभ्यासक्रम निर्मितीच्या तत्त्वानुसार तयार झालेला आहे वा नाही हेही पहाणे अध्यापनाच्या दृष्टीने आवश्यक ठरते. प्रस्तुत अभ्यासक्रमाचे वाचन व मनन केल्यानंतर खालील बाबी अभ्यासक्रमाच्या तत्त्वानुसार दृष्टिपथात आल्यात त्याचे क्रमवार विवेचन पुढे करीत आहे.


मातृभाषेचा अभ्यासक्रम उच्च माध्यमिक स्तर इयत्ता 12 वी मराठी 


1) गद्य: 80 पृष्ठे (परिचय व टीपा सोडून)


2) पद्य: 400 ओळी (पैकी 100 ओळी प्राचीन)


3) स्थूलवाचन: 5 पाठ (ललित गद्य हा वाक्य प्रकार सुमारे 75 पृष्ठसंख्येत बसतील एवढी पाठसंख्या असावी)


4) लेखन एकूण 10 निबंध


1) निबंध चर्चात्मक, वर्णनात्मक, कल्पनात्मक


2 ) साराशं लेखन किमान 5 करणाऱ्यांचा अभ्यास


3) आकलन गद्य / पद्य उताऱ्यांवरील प्रश्नांची उत्तरे


4) पत्रलेखन कार्यालयीन आणि व्यावहारिक 


5) कार्यालयीन टिप्पणी / वृत्तांत लेखन / जाहिरात.


6) भाषांतर - 5 ओळी (इंग्रजी सुलभ मराठीत)


इंगजी उतारा निवडतांना विद्यार्थ्यांचा स्तर लक्षात घ्यावा.


5) व्याकरण अलंकार व्यतिरेक, अनन्वय, स्वाभावोक्ती


वृत पादाकुलक, अभंग, वसंत तिलका