घटकाचे निकष , घटक पार्श्वभूमी , घटक पृथ:करण - Component criteria, component background, component analysis

घटकाचे निकष , घटक पार्श्वभूमी , घटक पृथ:करण - Component criteria, component background, component analysis


1. घटक एकजिनसी असावा.


2. विविध कृती, अनुभूती व पाठ्यांश याची सुसूत्र गुंफण असावी.


3. विद्यार्थ्यामध्ये योग्य बदल घडून आणता यावी.


घटक पार्श्वभूमी :


मराठी काव्यात संत काव्याला विशेष स्थान आहे. महाराष्ट्राच्या पावन भूमीत अनेक संतानी काव्याच्या माद्यमातून वैचारिक प्रबोधन केले. खऱ्या अर्थाने मराठी कवितेची सुरूवात संतकाव्यातून झाली आहे. संत काव्यातून प्रतिबिंबित पारमार्थिक विचार, भावना इत्यादींना चिरंतन मूल्य आहे. इयत्ता 6 वी 'संतवाणी', इयत्ता 7 वीत मराठीची थोरवी इयत्ता 8 वीत संत कविता' या माध्यमातून संतकाव्याचा परिचय विद्यार्थ्यांना झालेला असतो.


घटक पृथ:करण :


नामदेवांनी आपल्या अभंगातून ज्ञानाचा महिमा वर्णन वर्णीत केला आहे. गुरू निवृत्तीनाथ प्रती भक्तीचे काव्यमय वर्णन 'गुरुमहिमा मधून केले आहे. अभंगवाणी मधून विठ्ठलाच्या भेटीकरिता आतुर कान्होपात्रा व निर्मळाच्या भक्तीभाव व उत्कट मनाचे वर्णन केले आहे. तुकारामाचे अभंग' मधून खऱ्या भक्ताची लक्षणे सांगितली आहे. मानवी जीवनातील शक्तीचे महत्त्व शक्तीगौरव मधून रामदासांनी वर्णन केले आहे.


नामदेवाची अभंगवानी, गुरुमहिमा अभंगवाणी, तुकारामाचे अभंग, शक्तीगौरव हे संतकाव्य परस्परासी संबंधित आहे. यातील वैचारिक भाव समान आहे. मराठी भाषेतील शब्दसौंदर्य, अलंकार, वृत्ते, काव्यविशेषता, मनातील उत्कट भाव, यातील सुसंगती विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून द्यावी. शिक्षकांच्या गायनाद्वारे रसास्वाद वृद्धींगत करता येते.