घटक नियोजन - component planning
घटक नियोजन - component planning
वार्षिक नियोजनाच्या यशस्वितेकरिता घटक नियोजन महत्त्वाचे ठरते. पाठ नियोजनाशिवाय घटक नियोजन व घटक नियोजनाशिवाय वार्षिक नियोजन यशस्वी होऊ शकत नाही. परस्परातील यथार्ततेवर समग्र नियोजनाची यशस्वीता निर्भर असते. वार्षिक नियोजनातील विभिन्न घटकांचे अद्यापनाच्या दृष्टीने नियोजन करणे आवश्यक असते. वार्षिक नियोजनावर आधारित घटक नियोजनामुळे अध्यापनात सुसूत्रता येते. घटकानुसार पाठ नियोजन केले की अध्ययन अध्यापनात सलगता, एकसंघता निर्माण होऊन निर्धारित उद्दिष्टाची पूर्तता करता येते.
साहचर्याच्या मानसशास्त्रीय सिद्धांताचा उपयोग घटक नियोजनाकरिता होतो. समान घटकामुळे समान विचार, समान रचना, समान मूल्य, समान तत्त्वाची सुयोग्य मांडणी करता येते. याचा उपयोग तुलना करणे, फरक करणे, समानता शोधणे इ. करिता घटक नियोजनाचा उपयोग होतो. घटक नियोजनाच्या सुरवातीला घटकाचे पृथ:करण करावे. घटक नियोजनातून अध्यापन घटक, अध्यापन मुद्दे, पाठ्यवस्तू, उद्दिष्ट्ये व स्पष्टीकरणे अध्यापन पद्धती, शैक्षणिक साधने, अध्यापन अनुभव, मूल्यमापन ( निरीक्षण, लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा) याचा योग्य बोध होतो. उद्दिष्टाची पूर्तता न झाल्यास अध्यापन पध्दती, अध्ययन अनुभूती, शैक्षणिक साहित्य, मूल्यमापन साधने इत्यादीचा पुनर्विचार करावा लागतो.
वार्तालाप में शामिल हों