दैनंदिन पाठ नियोजन - Daily lesson planning
दैनंदिन पाठ नियोजन - Daily lesson planning
वार्षिक, घटक नियोजनाप्रमाणेच पाठ नियोजनाचे विशेष महत्त्व आहे. वार्षिक व घटक नियोजनाप्रमाणेच पाठ नियोजनाची पूर्वतयारी करावी लागते. वर्ग अध्यापनाकरिता पाठाचे सूक्ष्म नियोजन करावे लागते. एका तासिकेत पाठाचे अध्यापन करतांना काय शिकवायचे, कसे शिकवायचे, किती पाठ्यांश शिकवायचे, कोणती शैक्षणिक साधने, अध्यापन पद्धती व तंत्र कोणते वापरायचे याचे पूर्वनियोजन करावे लागते. एखाद्या पाठाचे अध्यापन एकापेक्षा अधिक तासिकेत करण्याकरिता एकत्र पूर्वनियोजन करावे लागते. वार्षिक व घटक नियोजनाची यशस्विता पाठ नियोजनवर अवलंबून असते. कोणताही विषय शिकवितांना प्रथम सम्यक दृष्टीची नितांत आवश्यकता आहे. नंतर विषयाच्या पाठ्यांशाचे अध्यापन करावे लागते.
पाठ्यांशाचे पृथ:करण, उद्दिष्ट्ये, अध्ययन अनुभव पद्धती, शैक्षणिक साहित्य याचेनुसार पूर्वनियोजन करावे लागते. पाठ नियोजनाची रूपरेखा तयार झाली की, प्रस्तावना, हेतुकथन, विषयविवेचन, संकलन, उपयोजन, गृहपाठ या पाठाच्या पायऱ्यानुसार नियोजन करावे. अध्ययन-अध्यापन सहज व नैसर्गिक झाले तरच त्याचा चांगला परीणाम होतो. वर्गात सहजस्फूर्त, नैसर्गिक वातावरण निर्माण करण्याची नितांत गरज असते. शिक्षकाने अद्यापनात रंजकता असावी. विषयात उत्सुकता व गोडी निर्माण करावी. वर्गाध्यापनात भाषाप्रभुत्व, विद्यार्थी सहभाग, अवधान केंद्रीकरण, शैक्षणिक साहित्याचा कौशल्याने उपयोग करतो. कठीण पाठ्यांश सोपा करण्याकरिता विविध अध्यापन पद्धती व तंत्राचा वापर करतो.
वार्तालाप में शामिल हों