संभाषण पद्धती - Dialog Method

संभाषण पद्धती - Dialog Method


संभाषण हा शब्द 'भाषण' या धातुसाधित नामापासून आला आहे. संभाषण म्हणजे सं + भाष होय. अर्थातच संभाषण म्हणजे एखाद्या विषयाबाबत दोन किंवा अधिक व्यक्तीत होणारे बोलणे म्हणजे संभाषण होय. संभाषणात एक- दुसऱ्याची ओळख करणे, बोलणे, प्रश्न विचारणे, उत्तरे देणे, सूचना करणे, विनंती करणे, आज्ञा करणे या बाबींचा समावेश होतो. 


संभाषण पद्धतीचा अर्थ :


“स्वतःचे विचार व्यक्त करणे व दुसऱ्याचे विचार ऐकून घेवून संभाषण कौशल्य विकसित करण्याच्या पद्धतीला संभाषण पद्धती म्हणतात."


संभाषण पद्धती


संभाषण परिणामकारक होण्याकरिता संभाषण कौशल्य विकसित करावे लागते. संभाषणात आपुलकी असावयास हवी. स्व:तचे विचार व्यक्त करणे व दुसऱ्याचे विचार ऐकून घेणे महत्त्वाचे असते. संभाषण श्रवणीय, भावपूर्ण, आकर्षक, मैत्रीयुक्त, आपुलकीपूर्ण असावयास हवे. संभाषण शिष्टाचारयुक्त असावे. संभाषण कौशल्य विद्यार्थ्यात विकसित करण्यासाठी शिक्षकाने जाणीवपूर्वक प्रयत्न करावयास हवे. प्राथमिक व माध्यमिक शाळेत संभाषण कौशल्य विकसित करण्याचे प्रयत्न कसोसीने करावे. संभाषण पद्धतीचा अवलंब करून विद्यार्थ्यात संभाषण क्षमता व संभाषण कौशल्य विकसित करता येते. विविध प्रसंग निर्माण करून संभाषण कौशल्य विकसित करता येते. संभाषण तुटक, निरस, रूक्ष होऊ नये याची दक्षता घ्यावी. संभाषण कौशल्याच्या सहाय्याने दोन व्यक्तीतील संभाषण प्रभावी, भावपूर्ण होण्यास मदत होते.


निम्न वर्गाकरिता संभाषण पद्धती उपयुक्त ठरते. या वयोगटातील विद्यार्थ्यांना संभाषण उत्तम प्रकारे शिकविता येते. संभाषणाचे कौशल्य विकसित झाल्यास विद्यार्थ्यांना भविष्यात उत्कृष्ट संभाषण करता येते. चांगल्या संभाषनाद्वारे परस्परातील भावबंध जोपासता येते. व्यक्तिमत्व विकासातील महत्त्वपूर्ण घटक संभाषण कौशल्य होय. संभाषण कौशल्य आत्मसात असणारा शिक्षक विद्यार्थ्यात संभाषण कौशल्य संक्रमित करू शकतो.