लेखनाचे मूल्यमापन - Evaluation of writing

लेखनाचे मूल्यमापन - Evaluation of writing


1) लेखी परीक्षा लेखनाचे मूल्यमापन करण्यासाठी लेखी परीक्षा हे महत्त्वाचे साधन आहे. लेखी परीक्षेत तीन प्रकारचे प्रश्न असतात.


अ) वस्तुनिष्ठ प्रश्न 

ब) लघुत्तरी प्रश्न 

क) दीर्घोत्तरी प्रश्न 


अ) वस्तुनिष्ठ प्रश्न :


वस्तुनिष्ठ प्रश्नाद्वारे इयत्ता ली ते 3 रीच्या विद्यार्थ्यांचे अक्षर, शब्द, वाक्य इत्यादींचे लेखन, त्याचप्रमाणे सुलेखन, दृकलेखन, श्रुतलेखन यांचे मूल्यमापन करता येते.


उदा.


शब्द ऐका व तो शब्द लिहा. शब्द वाचा व तो शब्द लिहा.

वाक्य वाचा व ते लिहा.


योग्य जोडया लावा.


रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा.


शब्दांचा योग्य क्रम लावून वाक्य परत लिहा. खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे लिहा.


आ) लघुत्तरी प्रश्न :


लघुत्तरी प्रश्नांद्वारे विद्यार्थ्यांच्या लेखनातील शुद्धलेखन, वाक्यलेखन, शब्दसंपत्ती, सुलेखन इत्यादींचे मूल्यमापन करता येते.


उदा. (1) थोडक्यात उत्तरे लिहा.


(2) संदर्भासह स्पष्टीकरण लिहा.

निबंधवजा प्रश्न:


या प्रश्नाद्वारे विद्यार्थ्यांच्या लेखनातील शुद्धता, सुलेखन, परिच्छेद लेखन, आशययुक्तपणा, परिणामकारकता इत्यादींचे मूल्यमापन करता येते.


i. खालील एका विषयावर निबंध लिहा.


ii. मित्राला अभिनंदनपर पत्र लिहा.


iii. खालील मुद्यांच्या आधारे कथा पूर्ण करा. अशा प्रकारे लेखी परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांच्या लेखन घेणे.


कौशल्याचे मूल्यमापन करता येते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचा वर्गपाठ, गृहपाठ इत्यादींची वेळोवेळी तपासणी करून शिक्षकाला मूल्यमापन करता येते.