माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील मराठी पाठ्यपुस्तकाचे परीक्षण - Examination of Marathi textbooks at secondary and higher secondary level

माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील मराठी पाठ्यपुस्तकाचे परीक्षण - Examination of Marathi textbooks at secondary and higher secondary level


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 1986 च्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमाची पुनर्रचना केलेली आहे. अभ्यासक्रम तयार झाल्यानंतर तो अभ्यासक्रम निर्मितीच्या तत्त्वानुसार तयार झालेला आहे वा नाही हेही पहाणे अत्यावश्यक ठरते.


मातृभाषेचा अभ्यासक्रम


माध्यमिक स्तर (इयत्ता 10 वी ) मराठी- प्रथम भाषा


गद्य - 64 पृष्ठे ( प्राचीन साहित्य)


पद्ये - 250 ते 300 ओळी (पैकी 100 ओळी प्राचीनकाव्य) पुरवणीवाचन एकूण 4 पुस्तके (प्रत्येकी सुमारे 100 पुष्ठे )


प्रवास, चरित्र, नाटक, निबंध, लघुकथा या प्रकारातीत पुस्तके 


लेखन - एकूण 10 निबंध विचारप्रधान, चर्चात्मक दोन बाजू देऊन एका बाजूचे समर्थन, कल्पनाविस्तार, वर्णनात्मक, ललित, आत्मवृत, कल्पनाप्रधान.


व्याकरण


समास- द्विगु कर्मधारय, बहुव्रीही प्रकार, विभक्ती बहुव्रीही, नत्र बहुव्रीही 


वृत- मुक्तछंद, आर्या, मंदाक्रांता, मालिनी, शार्दुविक्रीडीत अलंकार- 3 चेतनगुणोक्ती, दृष्टांत, रूपक


वाक्यसंयोजन - संयुक्त, मिश्र, केवल, लेखन नियमानुसार शुद्ध वाक्य 


लेखन - विरामचिन्हे वापरून वाक्याचे 


पुनर्लेखन - वाक्प्रचारांचा अर्थ व वाक्यात उपयोग व्याकरण चालविणे. पत्रलेखन- निमंत्रण, अभिनंदन, गौरव, आभार, वस्तूंची मागणी, चौकशी, विनंती अर्ज


सारांश लेखन- सुमारे 150 शब्दांचा उतारा आकलन- गद्य उतान्यातील प्रस्तुत अभ्यासक्रमाचे वाचन व मनन केल्यानंतर खालील बाबी अभ्यासक्रमाच्या तत्त्वानुसार दृष्टिपथात आल्यात त्याचे क्रमवार विवेचन पुढे करीत आहे.


1. अभ्यासक्रम उद्दिष्टानुसार असावा


माध्यमिक शिक्षण मंडळाले 10 वी चा अभ्यासक्रम 1986 च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार केलेता ओ. त्यात मातृभाषेची उद्दिष्ट्ये प्रथम पुनर्रचित केली गेली त्यामुळे ती सफल होतील याचा विचार निश्चितच सखोलपणे केल्या गेलेला आहे.

अभ्यासक्रम हा उद्दिष्टांवरच आधारित असतो. त्यादृष्टिने राष्ट्रीय अभ्यासक्रमातील दहा गाभा घटकांना कुठे ना कुठे, म्हणजे एकतर अभ्यासक्रमाच्या उद्दिष्टात किंवा अभ्यासक्रमाच्या आशयात अथवा पाठ्यपुस्तकात स्थान मिळालेले आहे. हे. घटक कोणत्याही राज्याच्या अभ्यासक्रमात असणे माध्यमिक स्तरावरील पाठ्यक्रमाचा अभ्यासक्रमाच्या तत्वानुसार अभ्यासक्रम अनिवार्य आहे व त्या उद्दिष्टांना योग्यप्रकारे अभ्यासक्रमात स्थान दिले गेलेले आहे. मूल्य संस्कार अ) वैयक्तिक मूल्ये ब) सामाजिक मूल्ये क) राष्ट्रीय मूल्ये अभ्यासक्रमातून योग्य प्रकारे रूजविता येतात.


सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिक्षकांना अध्यापन करण्यासाठी योग्य दिशा मिळावी, त्यांचे अध्यापन प्रभावी व अर्थपूर्ण व्हावे ह्या हेतुने महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने शिक्षकांसाठीही हस्तपुस्तिका तयार केली यामुळे शिक्षक अधिक चांगल्या प्रकारे पाठातील आशय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू शकतील.

या हस्तुपुस्तिका अध्यापनाची तयारी, अध्यापनपद्धती, वाङमयीन वैशिष्ट्ये, पाठाचा आशय अपेक्षित नैतिक संस्कार, विद्यार्थ्यांना स्वाध्यायासाठी अधिक प्रश्न, वाचनासाठी संदर्भ पुस्तके ह्या सगळ्यांचा विचार केला गेला असल्याने उद्दिष्टानुसार पूर्ण करणे शिक्षकांसाठी सोयीस्कर झालेले आहे. 


2) अभ्यासक्रम पुस्तकी नसावा त्यात क्रियाशीलता आसवी


या दृष्टिने पाठ्यपुस्तक आणि हस्तपुस्तिकेतून विद्यार्थ्यांना भाषाभ्यास करण्यासाठी प्रश्न, शुद्धलेखनाचा सराव, निबंध लेखन, वाचनासाठी संदर्भसाहित्य, शिवाय इतरही उपक्रम सांगितले आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कृतीशीलतेला निश्चितच वाव आहे.


3) अभ्यासक्रमात विषयांशी समवाय साधला गेला पाहिजे


समवाय साधण्यासाठी विज्ञान, इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान ह्यावर आधारित पाठ पाठ्यपुस्तकाल दिलेले आहेत. त्यामुळे मातृभाषा व इतर विषयांचा समवाय साधता येतो


उदा. स्व-रूप पहा तत्त्वज्ञानाशी निगडित पाठ

औंधचा राजा-भूगोल व इतिहासाशी संबंधीत पाठ


4) विद्यार्थ्यांवर विषयाचा जास्तीचा बोजा पाडू नये -


जे विषय त्यांना शिकविल्या जातात त्यातीलही अनावश्यक माहितीचा माहितीचा भाग कमी केलेता आहे. 


(5) अभ्यासक्रम हा शहरी व ग्रामीण भागासाठी वेगळा असावा -


दृष्टिकोण मात्र साध्य होऊ शकली नाही कारण महाराष्ट्रातील प्रशालांतून मराठीचे अध्यापन होतांता सुसूत्रता यावी,

समपातळी यावी हे महत्त्वपूर्ण उद्दिष्टच मूळी अभ्यासक्रमाच्या मुळाशी आहे. आणि शिवाय सर्व साहित्य प्रकारची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी ह्या हेतुने वैचारिक निबंध, आत्मचरित्र, व्यक्तिचित्र, विनोदी लेख, ललित लेख, कथा कादंबरीतील उतारा, प्रातिनिधिक महानुभवीय गद्य, प्रातिनिधितशिवकालीन गद्य, संतसाहित्य, पंडिती काव्य, सुनीत, निसर्गकविता, भावकविता, सामाजिक जाणीव, जीवनचिंतन स्वभाषाप्रेम अशा विविध साहित्याची योग्य प्रकारे निवड अभ्यासक्रमात केली गेली आहे.


6) अभ्यासक्रमात अभ्यासपूरक कार्यक्रमांनाही स्थान असावे -


पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमानुसार प्रत्येक धड्याच्या मागे अभ्यासपूरक कार्यक्रमासाठी विध्यार्थ्यांना काय देता येईल ते भाषाभ्यास यातून स्पष्ट केले आहे. 


7) व्यक्तीला यशस्वी जीवन जगता यावे असे किमान शिक्षण अभ्याक्रमांतून मिळावे


दृष्टिकोण समोर ठेवूनच मातृभोषच्या पाठ्यपुस्तकात नैतिक संस्कार, ऐतिहासिक जाणीव, चारत्र्यइत्यादी जीवनावश्यक मूल्यांचे संस्कार करता येतील अशा वेच्यांची आवर्जून निवड करण्यात आलेली आहे. तसेच लेखन, पत्रलेखन, सारांश लेखन, आकलन व्याकरण ह्या अभ्यासकमातील घटकांचा यशस्वी जीवन जगण्यास निश्चितच उपयोग होतो.


8) अभ्यासक्रम लवचिक असावा


दृष्टिकोण लक्षात घेऊनच पाठ्यपुस्तक तयार होऊन सुद्धा त्यातील काही धडे व कविता वगळल्या गेल्या आहेत. विद्यार्थ्यांला विषयाचा जास्त बोजा होईल यांचा विचार करूनच वरील निर्णय घेतला असावा. अभ्यासक्रम मूळातच लवचिक स्वरूपाचा असतो. उद्दिष्टे सफल झाली नाहीत तर तो बदलत असतो उद्योन्मुख समाजातील गरजांनुसार तो बदलतो.


9) अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांच्या विकासाच्या अवस्थांना अनुकूल असावा -


सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा विचार करता त्यांचा बौद्धिक विकास तेवढासा झालेला नसतो त्यामुळे अभ्यासक्रम त्यांना कठीण असल्यासारखा वाटतो व ते स्वाभाविकही आहे. परंतु त्या दृष्टिने शिक्षकालाही हस्तपुस्तिका उपलब्ध करून दिलेली आहे व विषय विद्यार्थ्यांपुढे सोपा करून कसा मांडावा याचे स्पष्ट दिग्दर्शन त्यात केलेले आहे. त्यामुळे आज खरी जबाबदारी शिक्षकांचीच आहे. वास्तवात अभ्यासक्रमाची मांडणी विद्यार्थ्यांच्या वाढ आणि विकासाला अनुकूलच केलेली आहे. 


10) फुरसदीच्या वेळात विद्यार्थ्यांनी काय करावे याचे दिग्दर्शन


पाठ्यपुस्तकातील भाषाभ्यासात स्पष्ट केले आहे. तद्वतच शिक्षक ही स्वाध्यायाच्या स्वरूपात विद्यार्थ्यांना कृतीशील ठेवू शकतो.

अभ्यासक्रमात इतरही बरेच विषय असल्याने विद्यार्थ्यांना फुरसद मिळणेच असंभव पण मिळालेल्या संधीचा सदुपयोग करण्यासाठी पुरवणी वाचन, शालेय ग्रंथालयातील संदर्भ ग्रंथ इत्यादीचा विद्यार्थी उपयोग करून घेऊ शकतो.


11) मातृभाषेच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोण नैतिकमूल्ये, सामाजिक जाणीव, जीवनविषयक दृष्टिकोण, रसिकता इत्यादी सर्व बाबींचा विकास


अभ्यासक्रमातून हा विचार पाठ्यपुस्तकाच्या आधारे केल्या गेला आहे. अभ्यासक्रम राबविला कसा जातो त्यावर विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व सर्वांगांनी समृद्ध होणे अवलंबून असते. आर्थिक विकासाकडे या पाठातून नैतिक संस्कार, आमचे ग्रहण अजून सुटले नाही या पाठातून वैज्ञानिक संस्कार केले गेले आहेत. अशाप्रकारे विविध पाठ व कवितांतून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व समृद्ध होण्यावर भर दिला गेला आहे.


12) अभ्यासक्रमाला आपले तत्त्वज्ञान, आपली संस्कृती, आपली जीवनमूल्ये, नवीन समाजरचना या सर्व बाबींना जीणीवपूर्वक स्थान दिले आहे. बराचसा भाग हा आपली संस्कृती, तत्त्वज्ञान, समाजरचना यावरच आधारित आहे. संस्कृती संक्रमण व संवर्धन हे शिक्षणाचे प्रमुख ध्येय अभ्यासक्रमातून जोपासले गेले आहे. महानुभावपासून तर स्वभाषा प्रेमापर्यंत सर्वप्रकारच्या साहित्याचे संस्कार पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर रूजविण्याचा प्रयत्न अभ्यासक्रमातून केला आहे.


तात्पर्य माध्यमिक स्तरावरील 10 वी चा मातृभाषेचा प्रचलित अभ्यासक्रम अभ्यासक्रमाच्या तत्वानुसारच तयार केला गेला आहे. परंतु अभ्यासक्रम तयार करणे व तो राबविणे ह्यात जबरदस्त अंतर पडते अभ्यासक्रम तयार करणारे वेगळे व तो राबविणारे दुसरे, अभ्यासक्रम राबविला कसा जातो त्यावर अभ्यासक्रमाची यशस्विता अवलंबून आहे. म्हणूनच शिक्षण मंडळाने हस्तपुस्तिका सादर करून शिक्षकांना अध्यापनाची योग्य दिशा व मार्गदर्शन केलेले आहे. त्यानुसार जर तो राबविला गेला तर विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व एकांगी न राहता त्याला सर्वगामित्व येइल ह्यात शंका नाही.


शेवटी एकच सांगावेसे वाटते की 1986 चा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार जो अभ्यासक्रम बदलविला गेला तो क्रमशः 5 वी ते 10 वी पर्यंत असता तर अधिक बरे झाले असते. 9 वी च्या अभ्यासक्रम समजून घेई पर्यंतच 9 वी चे वर्ष संपून 10 वी चे वर्षसमोर उभे ठाकले होते. परिणामतः विद्यार्थी व शिक्षकांचा गोंधळ उडणे स्वाभाविकच होते.