स्पष्टीकरण पद्धती - Explanation Method
स्पष्टीकरण पद्धती - Explanation Method
विविध विचार, कल्पना शब्दातीत असतात. यातील नेमका अर्थ अनेकदा लक्षात येत नाही.
परिणामी निश्चित आकलन होत नाही. याकरिता कथा, उदाहरणे, दाखले, चित्र, अनुभव सामानार्थी - विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार इत्यादिचा उपयोग करावा लागतो.
स्पष्टीकरण पद्धतीचा अर्थ :
“कठीण व गूढ कल्पनांचे, विचाराचे वा तत्त्वाचे ज्यावेळी शब्दार्थ, उदाहरणे दाखले. कथा प्रसंग गोष्टी याद्वारे स्पष्ट करतात, तेंव्हा त्या पद्धतीला स्पष्टीकरण पद्धती म्हणतात."
स्पष्टीकरण पद्धती :
विचार, कल्पना स्पष्ट करावयाच्या असल्यास स्पष्टीकरणाच्या सहाय्याने हे कार्य तडीस न्यावे लागते. शब्दार्थ, उदाहरणे-दाखले, कथा प्रसंग- गोष्टी याद्वारे स्पष्टीकरण करता येते. भाषा शिकवितांना शब्दाचे वाक्प्रचार व म्हणीचे वेळोवेळी स्पष्टीकरण करावे लागते. कठीण व गूढ कल्पनांचे, विचाराचे वा तत्त्वाचे स्पष्टीकरण करण्याकरिता दाखले वा दृष्टांत उपयुक्त ठरतात. शिक्षकांनी अध्यापन करतांना दाखले व दृष्टांताचा योग्य उपयोग करावा. अनेकदा कथा प्रसंग- गोष्टी याद्वारे कल्पना, विचारांचे स्पष्टीकरण करता येते.
विद्यार्थ्यांना समजेल अशा उदाहरणे दाखले, कथा, प्रसंग, गोष्टी यांची निवड करावी. त्यातून निश्चित अर्थबोध व्हावा. विद्यार्थ्यांच्या अनुभव क्षेत्रातील उदाहरणे, दाखले व दृष्टांताचा वापर करावा. विद्यार्थ्यांचे वय, क्षमता, अनुभव याचाही विचार करावा. स्पष्टीकरण करतांना विविध उदाहरणाचा उपयोग करावा व उदाहरणात विविधता असावी.
आकलन पातळीच्या वरील वर्णने, कथाप्रसंग स्पष्ट करण्यासाठी चित्रात्मक साधनाचा योग्य उपयोग शिक्षकाने करावा. स्पष्टीकरण करतांना सामानार्थी व विरुद्धार्थी शब्दाचा वापर करावा. स्पष्टीकरणातील उणीवा फळ्याच्या सहाय्याने दूर करता येते. या विविध उपायाद्वारे विद्यार्थ्यांचे अनुभव क्षेत्र व्यापक करता येते.
वार्तालाप में शामिल हों