स्पष्टीकरण कौशल्य , फलकलेखन - Explanatory skills, board writing
स्पष्टीकरण कौशल्य , फलकलेखन - Explanatory skills, board writing
शिक्षकाच्या अंगी स्पष्टीकरण कौशल्य असणे महत्त्वाचे आहे. पाठ्यांशातील संबोध, संकल्पना, आकृती, सारणी, चित्र, काव्यपंक्ती इत्यादीचे स्पष्टीकरण करावे लागते. पाठ्यमुद्दे, कविता, वैचारिक लेख, वाक्प्रचार, कठीण शब्द इत्यादीचे सुलभ भाषेत निवेदन करावे लागते. याकरिता भाषा शिक्षकाच्या भाषेमध्ये ओघवतेपणा असावा. शिक्षकाने अनावश्यकपणा टाळावा. स्पष्टीकरणातील उणीवा दूर करून उत्तम स्पष्टीकरण कौशल्य आत्मसात करण्याकरिता सूक्ष्म अध्यापन तंत्राचा वापर उपयुक्त ठरतो.
फलकलेखन :
फळा हा शिक्षकाचा मित्र मानला जातो. फळा हे स्वस्त व सहज उपलब्ध होणारे शैक्षणिक साधन आहे. भित्ती फलक, गुंडाळी फलक, ओक्रीलिक फलक, फ्लॅनेल फलक इत्यादी प्रकारचे फलक येतात. कथन स्पष्टीकरणाला फलकलेखनाची सांगड घातल्यास चलत चित्राप्रमाणे परिणाम प्राप्त करता येतात. पाठ्यांशातील वाक्प्रचार, कठीण शब्द, मुहावरे, समान व विरुद्धार्थी शब्द, हेतुप्रश्न, गृहपाठ इत्यादी करिता फलक सहायक ठरतो. चेतक बदलाकरिता फलक प्रभावी साधन ठरते. शिक्षकाच्या चांगल्या फलक लेखनाचा प्रभाव विद्यार्थ्यांच्या अक्षर सुधारण्याकरिता होतो.
वार्तालाप में शामिल हों