पाठ्यपुस्तकाचे बहिरंग - External textbook
पाठ्यपुस्तकाचे बहिरंग - External textbook
1) पाठ्यपुस्तकाचा आकार
पाठ्यपुस्तकाचा आकार, लांबी-रुंदी, जाडी ही पुस्तक हाताळण्याच्या दृष्टिने सोयीची असावी. आकाराकडे पाहाताच ते विद्यार्थ्यांना आकर्षक वाटावयास हवे. पाठ्यपुस्तकाचा आकार प्रथमता विद्यार्थ्यांना पुस्तकाकडे आकर्षित करतो.
2) पाठ्यपुस्तकाचे मुखपृष्ठ व मलपृष्ठ -
मुखपृष्ठ व मलपृष्ठ साधे, मनोवेधक, रंगीत असावे. मुखपृष्ठावर पुस्तकाचे नाव, चित्र वा आकृती असावी. ज्यावरून पुस्तक कशाचे आहे ते पटकन ओळखता येईल. चित्र आकृती त्या-त्या वर्गानुरूप असावी. अर्थातच पाठ्यपुस्तकाचे मुखपृष्ठ व मलपृष्ठ आकर्षक असावे.
3) पाठ्यपुस्काचा कागद
पाठ्यपुस्तकाचा कागद पांढरा शुभ्र, जाड, गुळगुळीत, शाई न फुटणारा तसेच बरेच दिवस टिकणारा असावा आणि पांढराशुभ्र असावा. याचा लाभ पाठ्य मजकूर वाचणे सोपे व सोयीचे जाते. विद्यार्थ्याच्या डोळ्यांना त्रास होत नाही.
4) पुस्काचा टाईप आणि सुबक छपाई -
अक्षरांचा टाईप त्या त्या वयोगटातील विद्यार्थ्यांनुसार लहान-मोठा असावा. अक्षरांचा आकार, पुस्तकातील पानांची संख्या, ओळींची संख्या, प्रत्येक ओळीमधील अंतर, दोन शब्दातील अंतर, पानाच्या चारही बाजूस सोडावयाचा समास, मागच्या पानावरील छापलेल्या मजकुराचे ठसे पुढील पानावर दिसणार नाहीत या सर्व गोष्टींची खबरदारी पुस्तकाची छपाई करतांना घेतली पाहिजे.
5) पाठ्यपुस्तकाची बांधणी
पाठ्यपुस्तकाची बांधणी मजबूत व टिकाऊ असायला हवी. पक्क्या दोऱ्याने पुस्तक शिवले तर ते अधिक दिवसपर्यंत हाताळता येते. पुस्तकाच्या बांधणीवर पुस्तकाचे आयुष्य अवलंबून असते. बांधणी करतांना आतील अक्षरे शिवतांना दबली जाणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी.
6) पाठ्यपुस्तकाच्या पानांचा सुवास
पाठ्यपुस्तक उघडताच त्यांच्या पानांचा सुरेख वास आल्यास विद्यार्थ्यांचे मन प्रसन्न होवून ते पुस्तक उघडून पहाण्याची इच्छा त्यांच्या मनात निर्माण होते. प्रसन्न मनाचा प्रभाव विषयाकडे आकर्षित होण्याकरिता होतो.
7) पाठ्यपुस्तकाची किंमत
पाठ्यपुस्तकाची किंमत ही सर्व विद्यार्थ्यांना परवडेल अशी असावी. पाठ्यपुस्तक हे प्रत्येक विद्यार्थ्यांजवळ असणे आवश्यक असल्याने ते श्रीमंत, गरीब सर्व विद्यार्थ्यांना परवडणारे असावे. शिक्षनाचे सार्वत्रीकरण करण्यात याची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.
एकंदरीत पाठ्यपुस्तकाचे बहिरंग आकर्षक असले तरच अंतरंगात काय असेल हे जाणण्याची उत्सुकता विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होते.
वार्तालाप में शामिल हों