पाठ्यपुस्तक व पूरक पुस्तकाचे वैशिष्ट्ये - Features of textbook and supplementary book

पाठ्यपुस्तक व पूरक पुस्तकाचे वैशिष्ट्ये - Features of textbook and supplementary book


मराठी भाषा शिक्षणात पाठ्यपुस्तक व पूरक पुस्तकाला विशेष महत्त्व आहे. पाठ्यपुस्तकाची निर्मिती आदर्श पाठ्य पुस्तकाच्या निकषाच्या आधारे केली जाते. निर्धारित उद्दिष्टांच्या पूर्ततेकारिता पाठ्यपुस्ताकात पूरक पुस्तके सुचविली जाते. पाठ्यपुस्तक व पूरक पुस्तकाचे वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगता येईल. 


1. सह उद्देश्य : प्रत्येक पाठ्यपुस्तक व पूरक पुस्तकाची रचना करतांना उद्देश्य लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. निर्धारित उद्देश्याची पूर्तता करण्याची क्षमता पाठ्यपुस्तक व संबंधित पूरक पुस्तकात असावयास हवी. भाषेचा मूळ उद्देश्य कौशल्य विकास करणे असतो.


2. उपयुक्तता : मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून बाल्यावस्था, किशोरावस्था, प्रौढावस्था यानुसार अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तक व पूरक पुस्तकाचे निर्माण व्हावयास हवे. विद्यार्थ्याचे वय, क्षमता, रुची लक्षात घेवून निर्मित पुस्तक उपयुक्त ठरते. 


3. विषय विविधता :पाठ्यपुस्तकात अंतर्भूत विचार, संकल्पना, विषयात विविधता असावी. गद्य, पद्य, नाटक, कहाणी, निबंध इत्यादी विविध विषयावर पाठ समाविष्ट असावे.


4. रोचकता :आजची शिक्षण प्रक्रिया विद्यार्थी केंद्रित आहे. अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तक निर्माण करतेवेळी विद्यार्थ्याची आवड, क्षमता, योग्यता लक्षात घेणे आवश्यक आहे. 


5. जीवन संबंध: इयत्तानुसार निर्धारित अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक हा जीवनासी संबंधित असावा. जीवनासी असंबंध पाठ्यक्रमाचा उपयोग काहींही नाही. शिक्षणाचा जीवनासी संबंध प्रस्थापित करणे शिक्षणाचा प्रमुख उद्देश्य आहे. 


6. क्रमबद्ध :पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमबद्ध असावे. अध्यापन सूत्रानुसार पाठाची रचना असावी. क्रमबद्ध शिक्षण प्रभावी अध्ययनाकरिता महत्त्वाचे आहे.


7. आदर्शवादी : पाठ्यपुस्तकातील पाठ्यांश नवीन विचार, संदेश, प्रेरणा प्रदान करतात. 


8. व्यावहारिक : व्यावहारिक क्षमतांचा विकास करणे शिक्षणाचा प्रधान उद्देश्य आहे.


9. स्तरानुसार :


पाठ्यपुस्तकाची भाषा सरळ, सोपी व आकलनक्षम असावी. विद्यार्थ्याच्या इयत्ता स्तरानुसार पाठ्यपुस्तक निर्माण करावे,


10. भाषाशुद्धता :


पाठ्यपुस्तकाची भाषा व्याकरण दृष्ट्या शुद्ध असावी. व्याकरण अशुद्धतेचा प्रभाव विद्यार्थ्यावर नकारात्मक होवून भाषा विकासात अडसर निर्माण होतो. 


11. सार्थकता :


पाठ्यपुस्तकातील पाठ्यांश सार्थक व समर्पक असावा. अनावश्यक शब्द व वाक्यांचा समावेश टाळावा.


12. सह संबंध :


पुस्तकातील वाक्य, शब्द, उतारा यामध्ये सहसंबंध असावा. तसेच पाठ्यांशाचा जीवनासी सहसंबंध असावा.


13. भाषाधिकार :


पाठ्यपुस्तकातील भाषा विद्यार्थ्याच्या भाषा विकासास समृद्ध करणारी असावी. शब्द सामर्थ्य, शब्द सौंदर्य याच्या विकासास पोषक भंडार म्हणजे भाषेची पाठ्यपुस्तके होय. 


14. मौलिकता :


लेखक, कवी, विचारक यांच्या मूळ रचनेची छाटणी करतांना त्यातील मौलिकता कमी होणार नाही याची दक्षता घ्यावी.


15. शैलीची विविधता :


पद्य वाङमय, गद्य वाङमय, वैचारिक, स्फुट लेखन, निबंध लेखन, पत्र लेखन इत्यादीद्वारे विविध रचनामध्ये शैलीची विविधता दिसून येते. 


16. नाव :


पाठ्यपुस्तकाचे नाव सरळ, सुस्पष्ट, आकर्षक व बोधक असावे. पाठ्यपुस्तकाच्या शीर्षकावरून पुस्तकातील आशयाचा आभास व्हावा.


17. आकार:


पाठ्यपुस्तकाचा आकार अतिशय मोठा किंवा लहान नसून इयत्ता, वय, शारीरिक क्षमता नुसार असावा.


18. कागद


पाठ्यपुस्तकाचा कागद उत्कृष्ट दर्जाचा असावा. कमी प्रतीचा कागद असल्यास पाठ्यपुस्तके लवकर फाटण्याची शक्यता असते. 


19. मुद्रण :


पाठ्यपुस्तकातील छपाई शुद्ध असावी. अक्षर अतिशय लहान किंवा अतिशय मोठे नसावे. मुद्रण दोष टाळावे.


20. चित्र:


एक चित्र हजार शब्दाचे कार्य करते. आशय प्रभावीपणे स्पष्ट करण्याकरिता चित्र अतिशय उपकारक ठरते. प्राथमिक स्तरावर चित्र अतिशय सहायक व उपकारक ठरते.


21. बांधणी :


पाठ्यपुस्तकाची बांधणी मजबूत असावी. लहान विद्यार्थ्यास हाताळण्यास योग्य असावी.


22. आवरण : 


पाठ्यपुस्तकाचे मुखपृष्ठ व मलपृष्ठ आकर्षक असावे. मुखपृष्ठ व मलपृष्ठ याचा कागद व बांधणी मजबूत व उत्कृष्ट असावा.


23. मूल्य:


पाठ्यपुस्तकाची किंमत योग्य असायला हवी. जेणेकरून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना खरेदी करणे आर्थिक दृष्ट्या परवडणारे असेल.


उपरोक्त वैशिष्ट्ये असलेले पाठ्यपुस्तक व पूरक पुस्तके असने विद्यार्थ्याच्या भाषा विकासाकरिता उपयुक्त असते.