श्रवणाची सर्वसामान्य उद्दिष्टे - General purposes of hearing
श्रवणाची सर्वसामान्य उद्दिष्टे - General purposes of hearing
श्रवण म्हणजे अर्थपूर्ण ऐकणे. हे श्रवण का केले जाते याची वेगवेगळी उत्तरे आहेत. याचा अर्थ श्रवणाचे अनेक हेतू आहेत. सर्वसाधारणपणे श्रवणाचे उद्दिष्टये खालीलप्रमाणे सांगता येतात.
1) ज्ञानप्राप्ती :
श्रवण करून ज्ञान मिळवणे हा श्रवणाचा प्रमूख हेतू आहे. बरेचसे ज्ञान हे श्रवणाद्वारे प्राप्त होते. वर्ग अध्यापनात शिक्षकांच्या स्पष्टीकरण, कथन, वर्णन इत्यादी कृतींचे विद्यार्थ्यांनी केलेले श्रवण, रेडिओ व दूरदर्शनवरील बातम्यांचे श्रवण, व्याख्यानाचे श्रोत्यांनी केलेले श्रवण इत्यांदीच्या श्रवणातून श्रवण करणाऱ्याला ज्ञानप्राप्ती होत असते.
2) मनोरंजन / आनंदप्राप्तीः
ज्ञानप्राप्तीप्रमाणे आनंदप्राप्ती हा सुद्धा श्रवणाचा हेतू आहे. अनेक प्रकारच्या श्रवणातून श्रवण करणाऱ्याचे मनोरंजन होत असते. गाणी, सुरेल कविता जितक्या वेळा श्रवण केल्या जातात. तितक्या वेळा श्रवणातील आनंद वाढत जातो. कथा, नाटक यांच्या श्रवणातून मनोरंजन होते.
(आ) विश्लेषण व वर्गीकरण करणे :
हे श्रवणाचे महत्त्वाचे शालेय उद्दिष्ट आहे. श्रवण ही केवळ शारीरिक क्रिया नाही तर ती मानसिक क्रियाही आहे. कानाद्वारे ग्रहण केलेल्या ध्वनींचे मेंदू द्वारे विश्लेषण होऊन त्याचे वर्गीकरण केले जाते. मराठी आपली मातृभाषा असल्यामुळे श्रवणात येणाऱ्या मराठी ध्वनींचे विश्लेषण व वर्गीकरण नकळत घडते. परंतु इंग्रजी भाषेतील संवाद श्रवण करताना विश्लेषण व वर्गीकरणाची प्रक्रिया आपणास प्रकर्षाने जाणवते.
(इ) आकलनशक्तीचा विकास करणे :
श्रवणातून अर्थग्रहण होते. या अर्थग्रहणाच्या क्रियेतून श्रवण करणायांच्या आकलनशक्तीचा विकास होतो. श्रवणाद्वारे जे ऐकले त्याचा अर्थबोध होऊन त्याचे पूर्ण आकलन झाले पाहिजे. त्यामुळेच विद्यार्थ्यांना अर्थग्रहण करण्याची सवय लावणे व त्याच्या आकलनशक्तीचा विकास करणे हे श्रवणाचे महत्त्वाचे शालेय उद्दिष्ट्ये मानले आहे.
(ई) सर्जनशीलता : नवनिर्मिती :
अर्थपूर्ण श्रवण हे नवनिर्मितीस चालना देत असते. नाटकाचे श्रवण नाटयलेखनास प्रवृत्त करते. चांगल्या गीतांचे श्रवण गीत गाण्यास प्रवृत्त करते. उत्कृष्ट कथांचे श्रवण कथालेखनास प्रवृत्त करते. चांगल्या भाषाशैलीचे श्रवण स्वत:ची भाषाशैली निर्माण करते. म्हणी, वाक्प्रकार, सुभाषिते यांचे श्रवण त्यांचा वापर भाषणात,
लेखनात करण्यास प्रवृत्त करते. विद्यार्थ्यांकडून काही नवीन निर्माण व्हावे अशी अपेक्षा असेल तर विद्यार्थ्याना चांगल्या कलाकृती ऐकविल्या पाहिजेत.
(उ) भाषा अभ्यासाची पूर्वतयारी :
भाषेचा अभ्यास म्हणजेच भाषण, वाचन व लेखन होय. श्रवण या कौशल्यातूनच भाषण, वाचन व लेखन ही कौशल्य विकसित होतात. त्यामुळे भाषा अभ्यासाची पूर्वतयारी म्हणून पूर्व प्राथमिक व प्राथमिक शालेय स्तरावर श्रवणाला महत्त्व दिले आहे. या स्तरावरील विद्यार्थ्यांना श्रवणाच्या जास्त संधी उपलब्ध करून.
वार्तालाप में शामिल हों