श्रवणदोष व उपाय - Hearing loss and remedy

श्रवणदोष व उपाय - Hearing loss and remedy


श्रवण ही शरीर-मानस प्रक्रिया आहे. श्रवणदोष निर्माण होण्यास शारीरिक व मानसिक दोष कारणीभूत असतात. कानाचे आजार, बहिरेपणा या शारीरिक दोषामुळे निर्माण होणाऱ्या श्रवणदोषावर वैद्यकीय उपाय प्रभावी असतात. पण मानसिक कारणामुळे निर्माण होणाऱ्या श्रवणदोषांचे निराकरण शिक्षक करू शकतो. ते श्रवणदोष पुढीलप्रमाणे आहेत.


1) अर्थहीन श्रवण (अश्रवण) :


श्रवण करत असताना अवधान स्थिर नसणे, कानाने ऐकूनही न ऐकणे, ऐकलेल्याचे भान नसणे, श्रवणासाठी फक्त शारीरिक उपस्थिती असणे, मन दुसरीकडे भटकत असणे, यामुळे ऐकलेल्याचा अर्थबोध होत नाही. याला अर्थहीन किंवा अश्रवण म्हणतात.


2 ) अर्धश्रवण :


श्रवण करत असताना जितका वेळ श्रवणात लक्ष असेल तितकेच समजते. लक्ष विचलित झाले की श्रवणातील शब्दातील काही अक्षरे ऐकली जात नाहीत. उदा. 'बंदर' या शब्दऐवजी 'बंद' एवढेच ऐकले जाते. त्याचप्रमाणे वाक्यातील काही शब्द ऐकण्यातून सुटतात. उदा. मी त्याला मारले नाही' ऐवजी मी त्याला मारले' असे श्रवण होते. याप्रकारे पूर्णार्थाने जेव्हा श्रवण होत नाही त्याला अर्धश्रवण म्हणतात.


3) अशुद्ध श्रवण (अप श्रवण) :


बोलणारा बोलतो एक व श्रवण करणारा ऐकतो वेगळे, बोलणाऱ्या व्यक्तीच्या बोलण्यात आलेल्या शब्दाऐवजी, शब्दातील अक्षरांऐवजी चुकीचे शब्द, चुकीची अक्षरे ऐकली जातात. उदा. 'मला' ऐवजी 'माला', 'खडू' ऐवजी 'कडू', 'राम' ऐवजी 'रान' इत्यादी. जेव्हा शुद्ध श्रवण होत नाही त्याला अशुद्ध श्रवण (अपश्रवण) म्हणतात.