पाठ्यपुस्तक व पूरक पुस्तकाचे महत्त्व व वैशिष्ट्ये - Importance and features of textbook and supplementary book
पाठ्यपुस्तक व पूरक पुस्तकाचे महत्त्व व वैशिष्ट्ये - Importance and features of textbook and supplementary book
• प्राचीन काळात लेखन कला विकसित होण्यापूर्वी ज्ञान मुखोद्गत संग्रहित केले जात असे. त्यानंतर भोजपत्र, ताडपत्र, ताम्रपत्र, काष्टपत्र इत्यादीवर लेखन कार्य करण्यात येत होते. कालांतराने पुस्तकाच्या माध्यमातून ज्ञान संग्रह करण्यास प्रारंभ झाला. ज्ञानाच्या विविध शाखा विकसित झाल्या. ज्ञान शाखेतील ज्ञान ग्रंथाच्या रूपाने संग्रहित होऊ लागले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने पाठ्यपुस्तक व पूरक पुस्तके महत्वाची असतात. विषयतज्ञ, शिक्षणतज्ञ, शासन यांच्याद्वारे निर्धारित उद्दिष्टाची पूर्तता करण्याचे प्रभावी साधन म्हणजे पाठ्यपुस्तक व पूरक पुस्तके होय.
पाठ्यपुस्तक व पूरक पुस्तकाचे महत्त्व :
1. पाठ्यपुस्तक व पूरक पुस्तकात विषय ज्ञानासंदर्भात सर्व माहिती सामावलेली असते.
2. विषय ज्ञानाच्या माहितीचा समग्र साठा म्हणजे पाठ्यपुस्तक व पूरक पुस्तक होय.
3. ज्ञान प्राप्तीचे प्रभावी, सर्वोत्तम व अनिवार्य साधन म्हणजे पाठ्यपुस्तक व पूरक पुस्तक होय.
4. स्मरण विकास, सराव, ज्ञान संवर्धन, सकल संग्रह साठा, स्वयं अध्ययन साधन, रुची, सर्जनशीलता इत्यादीकरिता महत्त्वपूर्ण आहे.
5. स्वयं अध्ययनाचे सर्वोत्तम साधन होय.
6. अध्ययन- अध्यापनाचे सर्वोत्तम साधन म्हणजे पाठ्यपुस्तक व पूरक पुस्तक होय. व
7. विद्यार्थ्यांना गृहकार्य करण्यास सहायक साधन होय.
8. भाषण, वाचन, लेखन, श्रवण इत्यादी कौशल्याच्या विकासाकरिता उपयुक्त साधन होय. 9. विध्यार्थ्यात विविध क्षमतां विकसित करण्यासाठी सहायक ठरते.
10. अध्ययन अध्यापन अर्थातच शिक्षण प्रक्रियेत विद्यार्थ्यात रुची विकसित करता येते.
वार्तालाप में शामिल हों