वाचनाचे महत्त्व - The importance of reading
वाचनाचे महत्त्व - The importance of reading
मनुष्याच्या व्यक्तित्वाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी वाचन हे महत्त्वाचे साधन आहे. मानवाच्या जीवनाला आवश्यक असणारे ज्ञान वाचनातून मिळते. ग्रंथाच्या वाचनातून मानवाला जगण्याची, विकासाची प्रेरणा मिळते, संस्काराची देणगी मिळते, भावनेचा विकास होतो, ज्ञानाची प्राप्ती होते. निर्भेळ आनंद मिळतो. एवढे प्रचंड सामर्थ्य ग्रंथाच्या वाचनात आहे. म्हणूनच ग्रंथांना आपल्याच राखेतून पुन्हा जन्म घेणा फिनिक्स पक्ष्याची उपमा दिली जाते. जगात घडवणाऱ्या घडामोडी, अद्ययावत ज्ञान, तंत्रज्ञान इत्यादींची माहिती वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके यांच्या वाचनातून मिळते. वाचनाशिवाय मानवाचे जीवन अपूर्ण आहे. मानवाच्या जीवनात वाचाल तर वाचाल' हे तत्त्व महत्त्वाचे आहे.
शैक्षणिक प्रक्रियेतही वाचनाला महत्त्वाचे स्थान आहे. वाचन हे शिक्षणाचे प्रमुख साधन आहे. विद्यार्थ्याच्या ज्ञान मिळविण्याच्या क्षमतेत, आकलन क्षमतेचा विकास करण्यात, बौध्दिक व भावनिक विकास घडवण्यास वाचनाचा मोठा वाटा आहे. विद्यार्थ्यांच्या वाचन कौशल्याच्या विकासावरच त्याच्या लेखन या कौशल्याचा विकास अवलंबून आहे.
वार्तालाप में शामिल हों