लेखनाचे महत्त्व - The importance of writing

लेखनाचे महत्त्व - The importance of writing


ज्याला लिहिता वाचता येत नाही त्याला आपण निरक्षर मानतो. निरक्षरता हे मागासलेपणाचे लक्षण आहे. भाषणाप्रमाणे लेखनही आपले मनोगत व्यक्त करण्याचे साधन आहे. लेखनाद्वारे आपण आपल्या भाव, विचार व कल्पनांची अभिव्यक्ती करतो. भाषणाद्वारे आपले विचार फक्त काही श्रोत्यांपर्यंत पोहोचतात. पण लेखनाद्वारे मांडलेले विचार दूरदूरच्या वाचकांपर्यंत पोहोचतात. बोललेले आठवणे कठीण असते. पण जे लिहिलेले असते त्याचे वारंवार वाचन करणे शक्य असते. लेखनाला सामाजिक दृष्टीने फार महत्त्व आहे. लोकांना सुसंस्कृत, जागरूक व सुजाण नागरिक बनविण्याचे कार्य लेखनातून प्रभावी होते. आज प्रत्येक व्यक्तीला लेखन कौशल्य प्राप्त करणे अनिवार्य झालेले आहे. आपले विनंती अर्ज, तक्रारी, निवेदन लिहून सादर करावे लागतात. याप्रमाणे लेखन कौशल्य प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचे एक महत्त्वाचे अंग बनले आहे.