आगमन-निगमन - Inductive Deductive Method

आगमन-निगमन - Inductive Deductive Method 


ज्ञान प्राप्तीची ही शास्त्रीय व आधुनिक पध्दती मानली जाते. पृथ:करण, वर्गीकरण, संश्लेषण या प्रक्रियेतून ज्ञान प्राप्त केले जाते. निगमन पद्धतीलाच उद्गामी पद्धती असे म्हणतात. आगमन पद्धतीलाच अवगामी पद्धती असे म्हणतात. उदाहरणातून नियम वा सिद्धांत निर्मिती व नियम वा सिद्धांत उदाहरणाद्वारे स्पष्ट करण्याची समग्र प्रक्रिया आगमन-निगमन पद्धतीच्या संयोगातून घडविता येते. 


आगमन-निगमन पध्दतीचा अर्थ :


“उदाहरणातून नियम वा सिद्धांत निर्मिती व नियम वा सिद्धांत उदाहरणाद्वारे स्पष्ट करण्याची समग्र प्रक्रिया ज्या पद्धतीच्या संयोगातून घडविता येते, त्या पद्धतीस आगमन-निगमन पध्दती म्हणतात." 


आगमन-निगमन पध्दती:


निगमन पद्धतीलाच उगामी पद्धती असे म्हणतात. उगामी पद्धतीचा जनक हर्बार्ट या मानसशास्त्रज्ञास म्हटले जाते. व्याकरण, अलंकार, वृत्त इत्यादीच्या अध्यापनाकरीता ही पद्धत उपयुक्त ठरते. ज्ञाताकडून अज्ञाताकडे', 'विशिष्टाकडून सामान्याकडे', या अध्यापन सूत्रावर उद्गामी पद्धती आधारित आहे. पृथ:करण व वर्गीकरण करण्यापूर्वी विद्यार्थ्यासमोर अनेक उदाहरणे प्रस्तुत केली जातात. सामान्य घटक लक्षात घेऊन त्या आधारे नियम किंवा सिद्धांत तयार केला जातो. उद्गामी पद्धतीमध्ये उदाहरणाकडून नियम किंवा सिद्धांताकडे जाण्याचा क्रम असतो. शिक्षक जितकी उदाहरणे देतील तितकी विद्यार्थ्याची विषयासंबधीची संकल्पना स्पष्ट होते. उदाहरणे विद्यार्थ्यांच्या परिचयाची, सोपी, आकर्षक, सुबोध असावीत. पूर्वतयारी, विषयविस्तार, तुलना, सामान्यनियम, उपयोजन या उद्गामी पद्धतीच्या पायऱ्या आहेत.


पूर्वज्ञान व पूर्व अनुभव याची नवीन ज्ञान व नवीन अनुभवाशी पडताळणी करून ज्ञान प्राप्त करतात. पृथ:करण, संश्लेषण, साम्यता यानुसार अनुभवाशी तुलना करून सामान्य नियम बनविले जातात.

सामान्य नियम वा सिद्धांत निर्मितीला या पद्धतीत अत्यंत महत्त्व आहे. विद्यार्थीही शिक्षकाच्या सहकार्याने प्रयत्नाअंती सामान्य नियम वा सिद्धांत मांडू शकतात. उद्गामी पद्धतीमुळे विद्यार्थ्यात संशोधनवृत्ती, चिकित्सकवृत्ती, स्वयंअध्ययनवृत्ती, अनुमान क्षमता, उपयोजनक्षमता विकसित होते.


आगमन पद्धतीलाच अवगामी पद्धती असे म्हणतात. उद्गामी पद्धतीच्या उलटा क्रम अवगामी पद्धतीचा आहे. उगामी पद्धतीला पूरक पद्धती म्हणून या पद्धतीचा उपयोग केला जातो. उद्गामी पद्धतीद्वारा प्रतिपादित झालेले नियम व सिद्धांत अवगामी पद्धतीद्वारे पडताळून बघितले जाते. अवगामी पद्धती ही उपयोजनात्मक कार्य करते. व्याकरण, अलंकार, वृत्त इत्यादीच्या अध्यापनाकरीता ही पद्धत उपयुक्त ठरते. 'सामान्याकडून विशिष्टाकडे', या अध्यापन सूत्रावर उगामी पद्धती आधारित आहे.


अवगामी पद्धतीत सुरवातीला नियम वा सिद्धांत सांगितला जातो. विविध उदाहरणाद्वारे नियम वा सिद्धांत स्पष्ट केला जातो. उद्गामी अवगामी पद्धतीचा एकत्रित वापर प्रभावी अध्यापनास उपयुक्त ठरतो. ज्ञानाचे दृढिकरण, ज्ञानाचे उपयोजन याकरिता उगामी अवगामी पद्धती परस्परपूरक ठरते.