भाषा प्रयोगशाला पद्धती - Language Laboratory Method

भाषा प्रयोगशाला पद्धती - Language Laboratory Method


विज्ञान विषयाकरिता प्रामुख्याने प्रयोगशाळेचा उपयोग सर्वश्रुत आहे. प्रयोग करून ज्ञान प्राप्त करण्याची वैज्ञानिक पद्धती सर्वोत्तम आहे. आज सर्वच विषयात शास्त्रीय पद्धतीने ज्ञान प्राप्त करण्याची परंपरा विकसित झाल्याने त्यांना शास्त्राचा दर्जा प्राप्त झाला आहे. मानव्यशास्त्र व भाषा विषयात ज्ञान प्राप्तः करण्याकरिता प्रयोगाला प्राधान्य दिले जात आहे. शास्त्रीय ज्ञान प्राप्त करण्याकरिता मानव्यशास्त्र व भाषा विषयात प्रयोग पद्धतीचा उपयोग वाढत आहे. भाषा विषयाच्या अभ्यासाकरिता प्रयोगशाळेचा अधिकाधिक वापर होत आहे. भाषेची विविध कौशल्य प्राप्त करण्याकरिता भाषा प्रयोगशाळा पद्धतीचा उपयोग केला जातो. भाषा प्रयोगशाळा ही स्वयं अध्ययनाची प्रभावी पद्धत आहे. 


भाषा प्रयोगशाळा पद्धतीचा अर्थ :


“व्याकरण, संभाषण, उच्चारण, लेखन, श्रवण, भाषण, वाचन इत्यादीकरिता भाषा प्रयोगशाळेचा उपयोग केला जातो. त्या पद्धतीला भाषा प्रयोगशाळा पद्धती असे म्हणतात." 


भाषा प्रयोगशाळा पद्धती :


भाषण, लेखन, श्रवण, वाचन या मूलभूत कौशल्याकरिता प्रयोगशाळेचा उपयोग उत्तम ठरतो. प्रथम किंवा दुय्यम भाषा म्हणून मराठीतील विविध कौशल्य आत्मसात करण्याकरिता भाषा प्रयोगशाळेचा वापर उत्तम ठरतो. मराठी, हिन्दी, संस्कृत, पाली, प्राकृत, बंगाली, तेलगु या भारतीय भाषासोबतच इंग्रजी, जपानी, चीनी, स्पॅनिश इ. विदेशी भाषा अध्ययन करता येते. व्याकरण, संभाषण, उच्चारण, लेखन, श्रवण इत्यादीकरिता भाषा प्रयोगशाळेचा लाभ होतो. नियंत्रक मार्गदर्शकांच्या सहाय्याने उपलब्ध साधनसामुग्रीच्या आधारे भाषा प्रयोगशाळा कक्षात कौशल्य आत्मसात करता येते. नियंत्रक केंद्र स्थानावरून नियंत्रण व सूचना प्रसारित करू शकतो. यातून विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाची सवय लागते. विद्यार्थी स्वतःच्या क्षमता, गती, वेळ याच्या उपलबद्धतेनुसार कौशल्य आत्मसात करू शकते. भाषा प्रयोगशाळेत ध्वनित भाषापाठ, ध्वनिक्षेपक, ध्वनिग्राहक, ध्वनिवर्धक इ. साधनाची आवश्यकता होते. भाषा प्रयोगशाळा पद्धतीचे गुणदोष पुढीलप्रमाणे सांगता येतील.