व्याख्यान पद्धती , व्याख्यान पद्धतीचा अर्थ - Lecture Method, Meaning of Lecture Method

व्याख्यान पद्धती , व्याख्यान पद्धतीचा अर्थ - Lecture Method, Meaning of Lecture Method


महाविद्यालयातील विद्यार्थ्यासाठी व्याख्यान पद्धतीचा वापर प्रामुख्याने केला जातो. व्याख्यान पद्धतीत एखाद्या विषयावर, घटकावर शिक्षक अभ्यासपूर्ण माहिती, मते सलगपणे विद्यार्थ्यांना सांगत असतात. व्याख्यान ही शिक्षककेंद्री पद्धती असल्याने विद्यार्थ्यांचा सहभाग खूप कमी असतो. शिक्षकांना व्याख्यानासाठी शैक्षणिक साहित्याचा वापर करून विषयाची तयारी करून योग्य मांडणी करावी लागते. 


व्याख्यान पद्धतीचा अर्थ :


"एखाद्या विषयावर किंवा घटकांवर शिक्षकाने शैक्षणिक साहित्याचा योग्य वापर करून अभ्यासपूर्ण माहिती सलगपणे मांडणे म्हणजे व्याख्यान होय व या पद्धतीला व्याख्यान पद्धती असे म्हणतात."