पाठ नियोजनाचा आराखडा - Lesson planning outline

पाठ नियोजनाचा आराखडा - Lesson planning outline


दैनंदिन पाठाचे नियोजन करतांना त्याचा पूर्व आराखडा तयार करावा लागतो. दैनंदिन पाठ नियोजनाचा आराखडा तयार करतांना इयत्ता, तुकडी, तासिका, दिनांक, घटक, उपघटक, पाठ, पाठ्यांश या नोंदी कराव्यात. अपेक्षित पूर्वज्ञान लिहावे. पूर्वज्ञानावर आधारित पाठाची प्रस्तावना करावी. जो पाठ्यांश आज शिकवावयाचा आहे त्यावर आधारित हेतुकथन लिहावे. नंतर विषय विवेचन, संकलन व उपयोजन, गृहपाठ या पाठाच्या पायऱ्याा लिहाव्या. त्यानंतर फलकलेखन, निरीक्षक अभिप्रायाकरिता जागा सोडलेली असते. पाठाचे टाचण लिहितांना प्रशिक्षणार्थी स्वतःचे नाव, शाळेचे नाव, विषय, मार्गदर्शक, निरीक्षक, उद्देश्य, शैक्षणिक साहित्य इत्यादी नोंदी कराव्यात. पाठ नियोजनाच्या आराखड्यात विषयविवेचनाच्या पायरीमध्ये पाठ्यमुद्दे. उद्दिष्ट्ये व स्पष्टीकरणे, शिक्षक कृती व विद्यार्थी कृती, मूल्यमापन याप्रमाणे नोंदिकारिता रकाने राहतील. पाठ टाचणाच्या फलकलेखनाच्या रकान्यात विषय, पाठाचे नाव व क्रमांक, लेखक/ कवीचे नाव, हेतुप्रश्न, कठीण शब्द, वाक्प्रचार, म्हणी, महत्त्वाचे विचार, मुल्ये, अवतरणे, सुविचार इत्यादीची नोंद करता येते. याप्रमाणे दैनंदिन पाठाच्या नियोजनाचे वा टाचनाचे स्वरूप असते.