श्रवण क्रियेसंबंधीचे शिष्टाचार - Listening etiquette
श्रवण क्रियेसंबंधीचे शिष्टाचार - Listening etiquette
श्रवण करणान्या व्यक्तींनी श्रवण करताना पुढील शिष्टाचार पाळावेत.
1. बोलणाऱ्या व्यक्तीचे बोलणे लक्षपूर्वक व शांतपणे ऐकावे.
2. बोलणारा व्यक्ती बोलत असताना मध्येच बोलणे, एकमेकांत कुजबूज करणे इत्यादी कृती न करणे.
3. बोलणाऱ्या व्यक्तीविषयी आदर बाळगणे. बोलणाऱ्याकडे तुच्छतेने पाहणे, अपशब्द वापरणे, टोमणे मारणे इत्यादी अनादर दर्शविणाऱ्या कृती न करणे.
4. श्रवण करणाऱ्याने दुसरीकडे, पाठीमागे न पाहता बोलणाऱ्याकडे पाहावे.
5. बोलणाऱ्या व्यक्तीच्या बोलण्यास प्रतिसाद देणे. उदा. प्रसंगानुसार चेहन्यावर हावभाव आणणे, टाळ्या वाजविणे इत्यादी.
6. श्रवण करणाऱ्याने आळस देणे, जांभया देणे, मध्येच उठून जाणे इत्यादी कृतीन करणे.
7. आवश्यक व शक्य असल्यास ऐकताना महत्त्वाचे मुद्दे लिहून घेणे.
8. बोलणाऱ्याचे बोलणे संपल्यावर त्याचे आभार मानणे.
वार्तालाप में शामिल हों