मराठी आणि गणित - Marathi and Mathematics
मराठी आणि गणित - Marathi and Mathematics
मराठी आणि गणित या विषयाचा अतिशय निकटचा संबंध आहे. मराठी भाषेतील वैचारिक लेखाचे वाचन करतांना तार्किक शक्ती, चिंतनशीलता, विविधांगी विचार क्षमता इत्यादीचा विकास मराठी व गणित विषयाच्या अभ्यासातून घडून येतो. गणित विषयातून व्यवहारीक क्षमतांचा विकास घडून येतो तर याचे उपयोजन भाषेच्या माध्यामातून केल्या जाते. वेळचे नियोजन, जीवनाचे नियोजन करतांना गणिताचा आधार घ्यावा लागतो. गणित विषयाचे अध्यापन करतांना मातृभाषेतून (मराठी) केलेले अध्यापन अत्यंत प्रभावी होवून आकलन सहज होते.
एकंदरीत शाळेत शिकविले जाणारे विविध विषय भाषा, सामाजिक शास्त्रे, गणित-विज्ञान या प्रत्येक विषयाचा दुसऱ्या विषयाशी घनिष्ठ सहसंबंध आहे. एकूण समग्र जीवन माहीत करून घेण्यास हे विविध विषय एकमेकांस पूरक आहेत. तेव्हा विषय तुटक स्वरूपात न शिकविता ते सलगपणे शिकविले गेले पाहिजेत. विषयांतील सहसंबंध विद्यार्थ्यांना समजले तर त्या विषयांतील कौशल्ये अन्य विषयात उपयोगी पडतात व जीवनाचे सम्यक दर्शन घडू शकते.
वार्तालाप में शामिल हों