मराठी आणि सामाजिक शाख , मराठी आणि विज्ञान - Marathi and Social Sciences, Marathi and Science
मराठी आणि सामाजिक शाख , मराठी आणि विज्ञान - Marathi and Social Sciences, Marathi and Science
मराठी विषय शिकवितांना पाठ्यपुस्तकांत ऐतिहासिक संदर्भ असलेले पाठ समाविष्ट केलेले असतात. इ. 10 वीच्या कुमारभारती या पाठ्यपुस्तकात माधवराव पेशवे आणि न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे यांच्यावर आधारलेला रणजित देसाई लिखित 'न्याय' हा पाठ समाविष्ट केला आहे. त्याचप्रमाणे अपेश मरणाहून वोखटे' या पाठात दत्ताजी शिंदे यांच्या स्वभावाचे वर्णन आहे. पाठ्यपुस्तकातून ऐतिहासिक नाटकातील उतारेही दिसून येतात. हे पाठ शिकविताना शिक्षकांना इतिहासाचा उपयोग होतो.
इतिहासाच्या तासाला इतिहासाचे शिक्षक ऐतिहासिक घटना, समर प्रसंग, युध्दांची वर्णने, थोर पुरूषांची चरित्रे विद्यार्थ्यांना रंगवून सांगतात. हा इतिहास, ही वर्णने विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा उपयोग करून सांगितली जातात. असा मराठी-इतिहास या विषयांचा संबंध अतिशय जवळचा आहे. मराठी विषयाच्या शिक्षकाला इतिहासाचा आधार घ्यावा लागतो.
इतिहासातील काही घटना, प्रसंग, संदर्भ शिक्षकांना माहीत असणे आवश्यक आहे. इतिहास या विषयाचा अभ्यास मराठी विषय शिकविताना पोषक ठरतो.
मराठी विषय शिकविताना जसे ऐतिहासिक संदर्भ सहजगत्या येतात तसे भूगोल या विषयातील परिस्थिती, हवामान, मानवी जीवन, पिके, पाणी, देश, भूप्रदेश आदींचे संदर्भ पाठात येतात. मराठी शिकविताना भौगोलिक संदर्भही आपणास सांगावे लागतात. मराठीत प्रवासवर्णन या वाड्.मय प्रककारांतर्गत पाठात देशाचे लोकजीवनाचे संदर्भ येतात. पर्यावरणविषयक पाठ पाठ्यपुस्तकात असतात. भूकंपावर आधारित पाठ पाठ्यपुस्तकात असतात. अशा वेळी भौगोलिक माहिती शिक्षक विद्यार्थ्यांना पुरवितात. मराठी आणि भूगोल या विषयांत असलेला सहसंबंध ध्यानात घेतला पाहिजे.
याप्रमाणे अन्य समाजशास्त्रांचे संदर्भही पाठ्यपुस्तकात असतात. राज्यशास्त्र, अर्थशास्त्र यांसारखे विषयही समाजाशी निगडित आहेत. त्या विषयांचा संदर्भ असलेले पाठ विद्यार्थ्यांना मराठीच्या पाठ्यपुस्तकांतून अभ्यासावे लागतात. हे विषय अधिक स्पष्टपणे मांडताना शिक्षकांना या विषयांची मदत घ्यावी लागते.
मराठी आणि विज्ञान :
मराठी भाषांसारख्या भाषाभ्यासातून विद्यार्थ्यांत वैज्ञानिक दृष्टिकोण निर्माण व्हावा असे आपले उद्दिष्ट असते. समाजातील अपसमज, अंधश्रद्धा दूर व्हाव्यात असाही मराठी अध्यापनाच्या वेळी आपला हेतू असतो. वर्गातकाही पाठ शिकविताना शास्त्र विषयास धरून आपणास काही माहिती विद्यार्थ्यांना पुरवावी लागते. लेखकाचा त्या लेखनामागील हेतू, दृष्टिकोण स्पष्ट करावा लागतो.
वैज्ञानिक दृष्टिकोण विद्यार्थ्यांत निर्माण व्हावा या हेतूने मराठीच्या प्रत्येक पाठ्यपुस्तकात एक-दोन शास्त्रीय पाठांचा समावेश करण्यात आला आहे. शास्त्र मला माहीत नाही असे शिक्षकास म्हणून चालणार नाही. मराठी आणि शास्त्राचा (विज्ञानाचा) अन्योन्य सहसंबंध आहे. दि. व्यं. जहागीरदार यांचा 'राधिका', गजानन क्षीरसागर यांचा उर्जाराणी, निरंजन घाटे यांचा 'सौरऊर्जा', प्राणिजीवन शास्त्रविषयक माहिती देणारा प्रकाश गोळे यांचा 'बगळा' हा पाठ पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे. मराठी अध्यापन करताना विज्ञानविषयक संदर्भ, तपशील शिक्षकांना द्यावे लागतात. यासाठी विज्ञान विषयाचा आधार घ्यावा लागतो. पाठ्यपुस्तकात शास्त्र विषयासंबंधी काही उतारे विद्यार्थ्यांना भाषांतर करून द्यावे लागतात. शास्त्रज्ञांची चरित्रे विद्यार्थ्यांना अभ्यासावयास सांगता येतील. शास्त्रातील काही संकल्पना मराठी विषयाच्या अभ्यासातून जाणून घेता आल्या तर पुढील ज्ञान मिळविणे विद्यार्थ्यांना अधिक सोपे जाईल.
वार्तालाप में शामिल हों