भाषेचा अर्थ व उत्पत्ती - Meaning and origin of language
भाषेचा अर्थ व उत्पत्ती - Meaning and origin of language
दोन माणसांना एकत्र आणणारा, विचारांचे संप्रेषण म्हणजेच देवाण-घेवाण करणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे भाषा होय. अर्थात एकमेकांची भाषा न समजणारी दोन माणसे एकत्रित आली तर त्यांचे व्यवहार ठप्प होतील असे नाही. खाणाखुणांनी ते कदाचित आपल्याला काय हवे आहे ते सांगतीलही; पण जे हवे त्यासाठी जर शब्दच वापरले तर आशय समजणे सोपे जाते. म्हणूनच भाषा आणि मानवी जीवन एकमेकांमध्ये पूर्णपणे मिसळून गेलेले दिसते. पण मुळात भाषा म्हणजे काय हे बघू ?
'भाष्' या धातूचा अर्थ बोलणे असा होतो. भाषा म्हणजे बोलण्याची विशिष्ट पद्धती माणूस बोलतो म्हणजेच वेगवेगळे ध्वनी, आवाज काढतो. कंठ, ओठ, जीभ यांच्या साहाय्याने हे ध्वनी काढले जातात. ध्वनींना अर्थ प्राप्त होणे म्हणजेच भाषेची निर्मिती होणे होय. भाषेची फक्त निर्मिती होऊनच थांबली नाही तर माणसाने त्यावर संस्कार केले. भाषा सांकेतिक असते.
प्रत्येक शब्द एक प्रतीक असते. या संस्कारातच पुढे फक्त बोलली जाणारी भाषा जी मौखिक' स्वरूपात होती; तिच्यावर लिपिबद्धतेचे संस्कार झाले तिला दृश्य स्वरूप मिळाले. लिखित भाषेला महत्त्व प्राप्त झाले तरी मौखिक भाषाही तितकीच महत्त्वाची आहे. कारण माणूस लिहितो कमी, बोलतो अधिक लिहिणाऱ्यांपेक्षा बोलणाऱ्या माणसांची संख्या जास्त आहे. म्हणूनच मौखिक भाषेचा वापर सर्वच लोक (अपवाद मूक-बधीर) करू शकतात. लिखित भाषेला मात्र काही किमान प्रशिक्षणाची आवश्यकता असते.
काही माणसांच्या मते, परमेश्वराची विशेष कृपा म्हणून मानवाला भाषेचे वरदान मिळाले. या वरदानामुळेच आपण भाषा बोलू शकतो. मात्र शास्त्रज्ञांच्या मते, मानवाने प्राण्यांचे वेगवेगळे स्वर ऐकले, त्या स्वरांचे अनुकरण केले आणि त्याला भाषा बोलतो येऊ लागली. काही शास्त्रज्ञ भावनावेगातूनच ध्वनीची निर्मिती झाली आणि माणसाला भाषा बोलता येऊ लागली असे मानतात. मत कोणाचे काहीही असो, मात्र • भाषेचा जन्म हा चमत्कार आहे हे प्राध्यम विल्सन यांचे उदगार अतिशय सत्य आहेत. आदिमानवापासून ते मंगळावर मानवी वस्तीची स्वप्ने पाहणारा माणूस हा पल्ला केवळ भाषेमुळेच गाठू शकला हे नक्कीच. अनंत आमुची ध्येयासक्ती, अनंत अन् आशा' हे केवळ भाषेमुळेच शक्य झाले.
वार्तालाप में शामिल हों