सूक्ष्म नियोजन - micro planning
सूक्ष्म नियोजन - micro planning
छात्र शिक्षकांना कौशल्य प्राप्तीच्यादृष्टीने सूक्ष्म अध्यापन तंत्र महत्त्वपूर्ण आहे. विविध अद्यापन कौशल्य प्राप्तीकरिता सूक्ष्म अध्यापन कौशल्याचे चक्र सतत सुरू असते. सूक्ष्म अध्यापन तंत्र आत्मसातीकरण, विश्लेषण व प्रयोगाचे तंत्र होय. 1960 मध्ये अॅलन व इतर संशोधकांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठात संशोधन करून सूक्ष्म अध्यापन तंत्र विकसित केले. प्रश्न कौशल्य, चेतकबदल कौशल्य, फलकलेखन कौशल्य, स्पष्टीकरण कौशल्य, प्रबलन कौशल्य, दिग्दर्शन कौशल्य इत्यादी कौशल्य सूक्ष्म अध्यापनाद्वारे प्राप्त करता येतात.
सूक्ष्म अध्यापन तंत्राचा अर्थ :
“नियंत्रित परिस्थितीत शिक्षकाच्या विशिष्ट वर्तनावर लक्ष केंद्रित करणे व त्याचा सराव करणे ज्या पद्धतीमुळे शक्य होते अशा नियंत्रित सराव पद्धतीला सूक्ष्म अध्यापन असे म्हणतात.”
(अॅलन व ईव्ह)
"वेळ, वर्गाचा आकार, पाठाची लांबी आणि अध्यापनातील गुंतागुंत यांच्या संदर्भात छोट्या प्रमाणाचा अवलंब करणारा अध्यापन प्रसंग म्हणजे सूक्ष्म अध्यापन होय"
(मॅक अॅलीज व अन्विन)
“नवी अध्यापन कौशल्य विकसित करण्यासाठी व जुनी अधिक परिणामकारक होण्यासाठी आयोजित
केलेल्या छोट्या प्रमाणावरील अध्यापन प्रसंग म्हणजे सूक्ष्म अध्यापन होय
(मॅक नाईट)
वार्तालाप में शामिल हों