उद्दिष्ट्ये व स्पष्टीकरण - Objectives and Explanations
उद्दिष्ट्ये व स्पष्टीकरण - Objectives and Explanations
ज्ञान व आकलन :
1) विद्यार्थी, संत कवी / कवियत्रीचा परिचय करून घेतो.
2 ) विद्यार्थी, संतकाव्याची ओळख करून घेतो.
कौशल्य व उपयोजन :
1) विद्यार्थी अभंग गायनाचे कौशल्य संपादन करतो. 2) विद्यार्थी अभंगांना श्रवणीय चाली लावतो.
अभिरुची :
1) विद्यार्थी संताविषयी आपल्या भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो.
2) विद्यार्थी संताच्या रचनेविषयी आपल्या भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो.
रसग्रहण
1) विद्यार्थी अभंगातील सौंदर्य स्थळे दर्शवितो.
2) विद्यार्थी भक्तीभावाचा अविष्कार करतो.
व्यक्तिमत्व विकास :
1) शक्ती व भक्तीची उपासना शालेय जीवनापासून करण्याचा प्रयत्न करतो.
अध्यापन पद्धती व अध्ययन अनुभव :
कथन, स्पष्टीकरण, प्रश्न पद्धतीच्या सहाय्याने अभंग, श्लोक, ओवीचे गायनासह विवेचन केल्या जाते. शैक्षणिक साहित्याच्या (ध्वनिफीत, चीत्रध्वनिफित) वातावरण निर्मिती करतात. अध्यापन पद्धतीच्या सहाय्याने वातावरण निर्मिती करता येते.
मूल्यसंस्कार :
काव्यपाठातील मूल्ये आणि संस्कार विविध अध्यापन पद्धतीच्या सहायाने विद्यार्थ्यात रुजविता येते. मूल्य रुजाविण्याकरिता शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावयास हवे.
मूल्यमापन :
एकजिनसी घटक संतकाव्यावर आधारित घटक चाचणी द्वारे मूल्यमापन केल्या जाते. भावपूर्ण गायन करता येते का हे पाहता येते. घटक नियोजनावर आधारित घटक चाचणी करता येते.
मूल्यसंस्कार :
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमात दहा गाभाभूत घटकाचा समावेश असावा. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास, भारतीय संविधानात्मक जबाबदा-या, राष्ट्रीय अस्मिता जोपासण्यासाठी आवश्यक आशय, भारतीय सामायिक सांस्कृतिक वारसा, समानतावाद, लोकशाही व धर्मनिरपेक्षता, स्त्री- पुरुष समानता, पर्यावरणाचे संरक्षण, सामाजिक अडसराचे निर्मुलन, लहान कुटुंबाचे आदर्श, वैज्ञानिक मनोभावाची रुजवणूक असे दहा गाभाभूत घटक आहेत. गाभाभूत घटकावर आधारित अभ्यासक्रमाच्या अध्ययन- अध्यापनातून मूल्यसंस्कार करता येते.
वार्तालाप में शामिल हों