वाचनाची उद्दिष्टये - Objectives of reading
वाचनाची उद्दिष्टये - Objectives of reading
अ) वाचनाची सर्वसामान्य/व्यावहारिक उद्दिष्टयेः
1) ज्ञानप्राप्ती :
ग्रंथ, पुस्तके, वर्तमानपत्र, मासिके इत्यादींच्या वाचनामागील काही हेतूपैकी भूतकाळ व वर्तमानकाळाचे सखोल ज्ञान मिळविणे हा हेतू असतो. मनुष्य स्वतःला असणारी विविध विषयांतील ज्ञान मिळवण्याची इच्छा व आवश्यकता वाचनाद्वारे पूर्ण करत असतो.
2) आनंदप्राप्ती / मनोरंजन :
काही प्रकारच्या वाचनातून वाचकाला आनंद मिळत असतो. त्या वाचनाने त्याचे मनोरंजन होत असते. ते वाचन त्याचा एक विरंगुळा असतो. कथा, कादंबरी, कविता इत्यादीचे वाचन तो फावल्या वेळेत करतो. अशा अनेक रहस्यकथा, साहसकथा, विनोदीकथा, कादंबऱ्या आहेत. ज्या कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे आहेत. वाचक त्यात अडकत जातो. वाचकाला आनंद व मनोरंजन देण्याचे प्रचंड सामर्थ्य वाचनात आहे.
a. आकलनशक्तीचा विकास :
वेगवेगळ्या प्रकारच्या सतत वाचनाने आकलन शक्तीचा विकास होत असतो. अवांतर वाचनाची पुस्तके, वर्तमानपत्रातील अग्रलेख इत्यादींच्या वाचनातून आकलनशक्तीचा विकास होतो. इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांपेक्षा दहावीतील विद्यार्थ्यांची आकलनशक्ती वाचनातूनच विकसित झालेली असते.
b. संस्कारप्राप्ती :
वाचनाने चांगले संस्कार होऊन मनुष्य सुसंस्कृत व्हावा हा वाचनाचा एक हेतू असतो. वाचनातून चांगली तत्त्वे, सुविचार, नीतिमूल्य, आदर्श चरित्रे, संस्कृती इत्यादी वाचकाच्या मनात रूजतात व त्याला संस्कार प्राप्त होतात.
c. नवनिर्मिती / सर्जनशीलता :
वाचनातून नवनिर्मिती व्हावी हा वाचनाचा एक हेतू असतो. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांच्या वाचनात येणारे विचार, कल्पना, सुभाषिते, सुविचार, नवीन शब्द, वाक्यप्रचार व म्हणी इत्यादींचा वापर विद्यार्थी भाषण व लेखनात करतो. काव्यवाचन, कथावाचन, कादंबरीवाचन, नाटयवाचन इत्यादी साहित्यप्रकारांचे वाचन ते साहित्यप्रकार लेखनास प्रवृत्त करते. इतकेच नव्हे तर इतर क्षेत्रात नवनवीन संशोधनाद्वारे जी नवनिर्मिती झाली. शोध लागले त्या सर्वांचा पाया सखोल वाचनात आहे.
वार्तालाप में शामिल हों