लेखनाची उद्दिष्टये - Objectives of writing

लेखनाची उद्दिष्टये - Objectives of writing


अ) लेखनाची सर्वसामान्य/व्यावहारिक उद्दिष्टे : 


लेखनाची सर्वसामान्य किंवा व्यावहारिक उद्दिष्टये पुढीलप्रमाणे आहेत.


1) आत्मविष्कार :


व्यक्तीच्या मनातील भावना, विचार, कल्पना व्यक्त करणे म्हणजे आत्मविष्कार होय. भाषण व लेखन हे आत्मविष्काराचे साधन आहेत. भाषणापेक्षाही लेखनाद्वारे आत्मविष्करण चांगल्या प्रकारे होते. 


2) स्वमताचा प्रचार:


आपले मत, आपले विचार यांचा इतरांपर्यंत प्रचार व्हावा, त्यांनी त्याचा स्वीकार करावा हा लेखनामागील एक हेतू असतो.


3) मनःशांती :


आपल्या मनाला टोचणारे, बोचणारे विचार, भावना, प्रसंग यांचे लेखन करून मन हलके होत असते. त्यामुळे मनाला शांती व समाधान मिळते, दैनंदिनी लेखन, आत्मचरित्र इतयादी प्रकारचे लेखन मनःशांतीसाठी केले जाते.


4 ) सुसंस्कार :


आपल्या लेखात वाचकांवर परिणाम करणारी चांगली जीवनमूल्य पेरण्याचा प्रयत्न लेखक करतो. त्याचा तू म्हणजे वाचणारी व्यक्ती सुसंस्कारित व्हावी हा असतो. संतकाव्य, बालसाहित्य, बोधकथा इत्यादीचे उद्दिष्टये सुसंस्कार हे आहे.


ब) लेखनाची शालेय / शैक्षणिक उद्दिष्टये 


लेखनाची शालेय उद्दिष्टये खालीलप्रमाणे आहेत.


1. वर्ण, शब्द व वाक्य यांचे लेखन करता येणे.


2. आपले विचार, कल्पना, भावना व अनुभव स्वतःच्या शब्दात लिहिता येणे.


3. सुवाच्च व सुंदर हस्ताक्षरात लिहिता येणे. 4. शुद्धलेखन करता येणे.


5. अनुलेखन ( शिक्षकाचे पाहून लिहिणे) करता येणे.


6. दृकलेखन ( स्वतः पुस्तककात पाहून लिहिणे) करता येणे. 7. श्रुतलेखन ( सांगितलेले ऐकून लिहिणे) करता येणे.


8. दैनंदिन जीवनातील गरजांची पूर्ती करण्यासाठी लेखनाचा उपयोग करता येणे.


9. निबंधलेखन, सारांश लेखन, कल्पनाविस्तार लेखन, पत्रलेखन इत्यादी प्रकारचे लेखन करता येणे.