मराठी भाषा शिक्षणाचे जीवनातील स्थान व महत्त्व - The place and importance of Marathi language education in life
मराठी भाषा शिक्षणाचे जीवनातील स्थान व महत्त्व - The place and importance of Marathi language education in life
भाषा शब्द 'भाष' या धातूपासून बनला आहे. भाष् याचा मूळ अर्थ बोलणे. मानव स्वतःचे भाव, विचार इत्यादी मानसिकक तथ्ये प्रामुख्यांनी बोलण्याच्या माध्यमातून व्यक्त करतो. अथवा समजावून घेतो. तसेच भाषेचे मूळ स्वरूप म्हणजे बोलणे वा भाष्य होय.
जननी जन्मभूमी स्वर्गाआपी गरिअसी' (आई आणि जन्मभूमी स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहेत) येथे कवीने आईचा व जन्मभूमीचा गौरव केलेला आहे. आधुनिक काळात भाषेच्या माध्यमाशिवाय मानवी जीवन अपूर्ण आहे. त्यामुळे आई आणि जन्मभूमी इतकेच महत्त्व मातृभाषेला आहे.
आईच्या दुधावर बालकाची शारीरिक वाढ होते. बालकाचा मानसिक विकाससुद्धा आईच्याच ममतेने होतो. त्याचप्रमाणे व्यक्तीच्या जीवनात मातृभाषेला महत्त्व आहे.
जन्मभूमीतील पिकांवर व्यक्तीचे पोषक होते. पण मातृभाषेतील साहित्य, ज्ञान, माहिती यामध्ये व्यक्तीचा मानसिक व भौतिक विकास होतो. मातृभाषेच्या संस्काराचे क्षेत्र मोठे व्यापक आहे. प्रत्येक व्यक्ती मातृभाषेच्या सांस्कृतिक वातावरणात वाढते आणि राहते. या सांस्कृतिक वातावरणातूनच व्यक्तीला जीवनरस मिळतो. मनःपिंड घडतो. व्यक्तीच्या अंतःकरणातील भावनांचा प्रथम उद्रेक हा मातृभाषेतूनच घडतो. म्हणून मातृभाषा मराठी ही हृदयाची भाषा आहे. (Mother tongue is the language of (heart) असे इंग्लिश कवी कोलरिज ह्यांनी म्हटले आहे.
आईचे दूध ज्याप्रमाणे व्यक्तीच्या रक्तात असते. त्याचप्रमाणे जन्मभूमीच्या अन्नाने तयार झालेले रक्त शरीरात असते. त्याचप्रमाणे व्यक्तीच्या शरीरात मातृभाषेचे स्वत्त्वसुद्धा सळसळत असते. मातृभाषा व्यक्तीच्या थेट नेणीवेपर्यंत जावून बसलेली असते. मातृभाषेचे संस्कार व्यक्तीच्या मेंदूवर रूजलेले असतात. व्यक्तीला तीव्र वेदना, आनंद झाला तर अंतःकरणातून मातृभाषेचेच सहजोद्रार निघतात मातृभाषा ही अशा रितीने शरीरात आणि मनात भिनलेली असते. म्हणूनच तिचे जीवनातील महत्त्व अनन्यसाधारण आहे.
वार्तालाप में शामिल हों