अध्यापन अनुभवाचे नियोजन - Planning the teaching experience

अध्यापन अनुभवाचे नियोजन - Planning the teaching experience


आजचे युग नियोजनाचे युग आहे. नियोजनाने वेळ, श्रम व पैशाची बचत होते. हाती घेतलेले कार्य यशस्वी करण्यासाठी नियोजन करावेच लागते. कार्य यशस्वीरित्या पूर्ण करावयाचे असल्यास नियोजनानुसार कार्यवाही करावी लागते. दैनंदिन कार्याचे नियोजन सतत करावे लागते. व्यक्तीपासून शासनापर्यंत, ग्रामपंचायतीपासून जागतिक पातळीपर्यंत सर्वांना नियोजन करावे लागते. औद्योगिक प्रकल्प, पंचवार्षिक योजना, कुटुंब नियोजन, आर्थिक नियोजन इ. करिता नियोजन करावे लागते. शिक्षण हे राष्ट्रीय विकासाचे महत्त्वाचे साधन आहे.

कोठारी कमिशनच्या मते, भारताचे भवितव्य शाळेच्या वर्गा-वर्गातून घडते." अशावेळी शालेय नियोजनाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शैक्षणिक उद्दिष्ट्ये निर्धारित अभ्यासक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध साधनाच्या सहायाने प्राप्त करण्याकरिता नियोजनाची नितांत आवश्यकता आहे.


भाषिक, वाड:मयीन कौशल्य, मूल्य संवर्धन, चारित्र्य संवर्धन इ. करिता नियोजनाची नितांत आवश्यकता आहे. भाषा शिक्षकाला नियोजनपूर्वक कार्य करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणावा लागतो. विद्यार्थ्यांमध्ये अध्यापन कौशल्य विकसित करण्याकरिता सूक्ष्म अद्यापनाचे नियोजन करावे लागते. दैनंदिन पाठ नियोजन, घटक नियोजन, वार्षिक नियोजन करावे लागते.