प्रश्न कौशल्य , चेतक बदल कौशल्य - Question skills, Chetak change skills
प्रश्न कौशल्य , चेतक बदल कौशल्य - Question skills, Chetak change skills
प्रश्न विचारण्याचे कौशल्य सूक्ष्म अध्यापन तंत्राद्वारे आत्मसात करता येते. निम्न श्रेणी व उच्च श्रेणी प्रश्नाचा समावेश प्रश्न कौशल्यात समाविष्ट असतात. सूक्ष्म अध्यापनात निम्न व उच्च श्रेणी प्रश्नाची वारंवारिता किती याची नोंद निरीक्षणाद्वारे केली जाते. प्रश्नाचे स्वरूप व श्रेणी कोणती याची नोंद निरीक्षणाद्वारे केली जाते. () या चिन्हाद्वारे या नोंदी केल्या जातात.
चेतक बदल कौशल्य:
दैनंदिन अध्यापनाचे कार्य करीत असतांना शिक्षक व विद्यार्थ्यांना विविध कृती कराव्या लागतात. शिक्षकाला अध्यापन कार्य करीत असतांना कृतीनुसार हालचाल कराव्या लागतात. पाठ्यांशानुसार हावभाव करावे लागतात. आवाजात चढउतार करावे लागतात. फलकावर पाठ्यमुद्दे, चित्र, आकृती काढावे लागते. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारावे लागते. शैक्षणिक साधनाचे दिग्दर्शन करावे लागते. या बहुविध कृती म्हणजे चेतक बदल होय. अध्यापनात रोचकता आणण्याकरिता शिक्षक-विद्यार्थ्याच्या कृतीत विविधता असावी लागते. विद्यार्थ्याच्या शारीरिक व शाब्दिक सहभागात विविधता असावी लागते. प्रगट व मूक वाचन करावे लागते. शिक्षक व विद्यार्थ्याच्या कृतीची रचना विशिष्ट क्रमाने करणे म्हणजे चेतक बदल होय.
वार्तालाप में शामिल हों