वाचन कौशल्य - Reading skills

वाचन कौशल्य - Reading skills


वाचन हे महत्त्वाचे भाषिक कौशल्य आहे. साक्षरतेचे एक अंग आहे. लिहिलेल्या किंवा छापलेल्या मजकुराचे आपण डोळ्यांद्वारे ग्रहण करतो. या मजकुरातील अक्षरे आपण ओळखतो. ध्वनी ज्ञानांच्या मदतीने आपण अक्षरांचे उच्चार करतो. पण केवळ डोळ्यांनी अक्षरे पाहून त्यांचे उच्चार करणे म्हणजे वाचन नव्हे, तर वाचनात अर्थ समजणे खूप महत्त्वाचे असते. जॅगर यांच्या मते, 'वाचन म्हणजे केवळ अक्षरे वाचणे नव्हे तर वाचलेल्या अक्षरांच्या मदतीने विचार करणे होय.


'वाचन' ही एक प्रक्रिया वाटत असली तरी त्यामध्ये तीन क्रिया घडत असतात. शब्दांचे डोळ्यांकडून ग्रहणशब्दांच्या अर्थाचे आकलन शब्दांचे उच्चारण या क्रिया वरील क्रमाने वेगाने घडतात.