मराठीत प्रसार माध्यमाची भूमिका - Role of Marathi Media
मराठीत प्रसार माध्यमाची भूमिका - Role of Marathi Media
भारत बहुभाषिक राष्ट्र असल्याने प्रत्येक राज्याची स्वतंत्र भाषा आहे. महाराष्ट्र राज्याची राजभाषा म्हणून मराठीचा स्वीकार केला आहे. प्राथमिक स्तरापासून उच्च शिक्षणापर्यंत मराठीतून शिक्षण देण्याची सोय महाराष्ट्र शासनाने केली आहे. त्रिभाषा सूत्रानुसार आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून इंग्रजी, राष्ट्रीय भाषा म्हणून हिंदी व प्रादेशिक भाषा म्हणून महाराष्ट्रात मराठी भाषेचा स्वीकार केला आहे. मातृभाषा आणि शिक्षण यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. सर्वांगीण विकासाच्या मुळाशी मातृभाषा असते. शिक्षणाचे सर्वोत्कृष्ठ माध्यम मातृभाषा होय. शालेय अभ्यासक्रमात मातृभाषा मराठीला महत्त्वाचे व मानाचे स्थान आहे. आत्मप्रगटीकरण, व्यावहारिक विकास, वैचारिक विकास, सामाजिक विकास, सांस्कृतिक विकास, भावनिक विकास, व्यक्तित्व विकास, शैक्षणिक विकास इ. च्या दृष्टीने मातृभाषा शिक्षण महत्त्वपूर्ण आहे.
आजच्या गतिमान युगात शिक्षण क्षेत्रात प्रचंड क्रांती होऊन ज्ञानाच्या कक्षा वृद्धींगत होत आहे. ज्ञानदानाचे कार्य गतिमान, अर्थबोधक, प्रभावी होणे अपरिहार्य आहे. “one picture is worth a thousand words” अर्थात एका चित्रातून हजार शब्दाचा आशय व्यक्त करत येतो. दृकश्राव्य साधनाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. वृत्तपत्र, मासिके, पाक्षिके, वार्षिकांक, विशेषांक, ध्वनिमुद्रिका, रेडीओ, दूरदर्शन, मोबाईल, संगणक, सोशल मिडिया साईट्स या साधनाचाही योग्य उपयोग करून भाषा विकास घडवून आणता येतो. 'दर्पण' हे मराठी भाषेचे आद्य वृत्तपत्र होय. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात. मराठी भाषा विकासात विविध भाषा संस्थाचाही महत्त्वपूर्ण वाट आहे.
वार्तालाप में शामिल हों