मराठी भाषा विकासात प्रसार माध्यमांची भूमिका - Role of Media in Marathi Language Development

मराठी भाषा विकासात प्रसार माध्यमांची भूमिका - Role of Media in Marathi Language Development


 मराठी भाषा विकासात प्रसार माध्यमांची भूमिका खालील प्रमाणे स्पष्ट करता येईल. 


भाषा विकास :


भाषा विकासास प्रसार माध्यमांची भूमिका अनन्यसाधारण आहे. मराठी भाषा विकासाकरिता

भाषण, वाचन, श्रवण, लेखन, संभाषण इ. कौशल्याचा विकास अवलंबून असतो. भाषा प्रयोगशाळा भाषा विकासाचे महत्त्वाचे व प्रभावी केंद्र होय. 


अभिरुची व अभिवृत्ती विकास :


मराठी भाषा विकासाकरिता विद्यार्थ्यात वयीन अभिरुची व अभिवृत्ती विकसित करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या विकासात विषय रुची व अभिवृत्ती महत्त्वपूर्ण ठरते. प्रसार माध्यमांची विविध साधने अभिरुची व अभिवृत्ती विकासाकरिता सहायभूत ठरतात.


कौशल्य विकास


मराठी भाषा विकासात भाषण, वाचन, श्रवण, लेखन, संभाषण इ. कौशल्याचा विकास करणे अभिप्रेत आहे. वृत्तपत्र, मासिके, पाक्षिके, वार्षिकांक, विशेषांक, ध्वनिमुद्रिका, रेडीओ, दूरदर्शन, मोबाईल, संगणक, सोशल मिडिया साईट्स इत्यादी साधनाच्या सहायाने विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे विकसन करता येते.


रसास्वाद :


मराठी भाषा विकासात कविता, नाटक, कादंबरी यांच्याद्वारे रसास्वाद निर्माण करता येते. ध्वनिमुद्रिकाच्या सहायाने काव्याभिरुची विकसित करता येते. रसग्रहण क्षमता विकसित करण्याकरिता शिक्षकाने विशेष पुढाकार घ्यावा.


वृत्तपत्र, मासिके, पाक्षिके, वार्षिकांक, विशेषांक, ध्वनिमुद्रिका, रेडीओ, दूरदर्शन, मोबाईल, संगणक, सोशल मिडिया साईट्स इत्यादी माध्यमाचा प्रभावी उपयोग करता येतो. शिक्षकाच्या अध्यापन कार्याला सहायक कार्य प्रसार माध्यमाचे आहे. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजे प्रसार माध्यम होय. या दृष्टीने प्रसार माध्यमाचे महत्त्व मोठे असून शैक्षणिक विकासात ही सर्वाधिक महत्त्व आहे.