भाषण दोष व उपाय - speech defects and remedies
भाषण दोष व उपाय - speech defects and remedies
स्वत:चे विचार चांगल्या भाषेद्वारे व्यक्त करता येणे ही बाब भाषण कौशल्यात येते. शुद्ध व स्पष्ट उच्चार हे भाषणाचे अंग आहे. योग्य व अचूक ध्वनींचा उच्चार न करता आल्याने उच्चारदोष निर्माण होतात.
उच्चारदोष निर्माण होण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
1. शारीरिक दोषामुळे
2. मानसिक कमकुवतपणामुळे
3. अज्ञान व अनुकरणामुळे
1) शारीरिक दोषामुळे निर्माण होणारे उच्चार दोष:
ध्वनीच्या उच्चारासाठी जीभ, दात, ओठ, नाक या शारीरिक अवयवांचा वापर होतो. या अवयवांत दोष निर्माण झाल्यास उच्चार दोष निर्माण होतात..
2) जीभेचे दोष :
जीभ जड असणे, जीभेला शेंडा नसणे, जीभ टाळूला चिटकणे यामुळे च, छ, द, ध, ट, ठ इत्यादी वर्णांचे उच्चार चुकीचे होतात.
ब) दातांचे दोप :
वरच्या, समोरच्या दोन दातांची वेडीवाकडी वाढ असणे किंवा ते दात नसणे यामुळे त, थ, द, ध इत्यादी वर्णांचे उच्चार चुकीचे होतात.
क) नाकाचे दोष :
नाकातील हाड वाढणे व मास वाढणे यामुळे न, ण इत्यादी वर्णासोबत इतर अनेक वर्णांचे उच्चार अस्पष्ट होतात.
ड) ओठांचे दोष :
ओठ फाटणे, ओठाला ओठ चिटकणे यामुळे प, फ, ब, भ, म इत्यादी वर्णांचे उच्चार चुकतात.
उपाय :
शारीरिक दोषामुळे निर्माण होणाऱ्या उच्चार दोषांचे निराकरण करण्यासाठी वैद्यकीय उपचार घेऊन शारीरिक दोष दूर करणे.
2) मानसिक कमकुवतपणामुळे निर्माण होणारे उच्चार दोष:
मानसिक कमकुवतपणा व आत्मविश्वास नसल्यामुळे तोतरेपणा, हेल काढून बोलणे, बोलण्याची पुनरावृत्ती करणे अडखळत बोलणे हे दोष निर्माण होतात.
उपाय :
अ) विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे.
ब) सतत सराव देऊन दोष दूर करणे.
क) आवश्यकता वाटल्यास मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेऊन दोष दूर करणे.
3) अज्ञानातून व अनुकरणामुळे निर्माण होणारे दोष :
मुळाक्षर, जोडाक्षर यांच्या उच्चाराचे अचूक ज्ञान नसणे तसेच परिसर, कुटूंब इत्यादी ठिकाणी कानावर पडलेले चुकीचे उच्चार, या उच्चारांचे अशुद्ध स्वरूपात अनुकरण यामुळे वर्णांचे चुकीचे उच्चार, हस्व-दीर्घचे चुकीचे उच्चार, अनुस्वरांचे चुकीचे उच्चार, जोडाक्षरांचे चुकीचे उच्चार इत्यादी उच्चारदोष निर्माण होतात.
उपाय :
अ) विद्यार्थ्यांना वर्णांच्या उच्चार स्थानांची माहिती देणे.
ब) शिक्षकांनी व पालकांनी शुद्ध व स्पष्ट उच्चारात मुलांशी बोलणे. क) शुद्ध उच्चारांचा सराव घेणे.
ड) रेडिओ, टेपरेकॉर्डच्या साहाय्याने शुद्ध उच्चारांची नमुने विद्यार्थ्यांना ऐकवणे.
इ) शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे उच्चारदोष शोधून त्यावर उपाय करणे.
वार्तालाप में शामिल हों