भाषण-संभाषण उपक्रम (अध्ययन-अनुभव) - Speech-Speech Undertaking (Study-Experience)
भाषण-संभाषण उपक्रम (अध्ययन-अनुभव) - Speech-Speech Undertaking (Study-Experience)
विद्यार्थ्यांमध्ये भाषण या क्षेत्रामधील क्षमतांची संपादणूक होण्यासाठी खालील उपक्रम राबविता येतात.
1. विद्यार्थ्यांना मातृभाषेतील सर्व ध्वनींचा उच्चार करण्याचा सराव देणे.
2. विद्यार्थ्यांकडून सामूहिक व वैयक्तिकरित्या बडबडगीते, गाणी, कविता गाऊन घेणे. 3. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रश्न विचारून त्यांना उत्तरे देण्याची संधी देणे.
4. विद्यार्थ्यांसोबत गप्पागोष्टी करणे.
5. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास प्रवृत्त करणे.
6. विद्यार्थ्यांना सोपे विषय देऊन त्यावर भाषण करण्याची संधी देणे.
7. विद्यार्थ्यांना परिचित वस्तू, पदार्थ दाखवून वर्णन करायला लावणे, छोटे प्रसंग, घटना यावर वर्णन करायला लावणे.
8. विद्यार्थ्यांना सोपे विषय देऊन त्यावर वर्गचर्चा घडवून आणणे.
9. नाटकातील छोटे संवाद बोलण्याची विद्यार्थ्यांना संधी देणे, बालनाट्यांचे आयोजन करणे.
10. वादविवाद, कथाकथन स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना संधी देणे.
वार्तालाप में शामिल हों