पुरवणी वाचन - Supplementary reading
पुरवणी वाचन - Supplementary reading
विद्यार्थ्यांच्या वाचन कौशल्याचा विकास व्हावा, त्याला वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी पाठ्यपुस्तकांशिवाय इतर पुस्तके, ग्रंथ यांचे वाचन करणे म्हणजे पुरवणी वाचन होय. हे वाचन विद्यार्थ्यांने मोकळ्या वेळेत करायचे आहे. पुरवणी वाचनाचे दोन प्रकार आहेत. पाठयपुस्तकात स्वाध्यायात दिलेले पुरवणी वाचन व विद्यार्थ्यांने स्वतः प्रेरणेने केलेले पुरवणी वाचन, पाठयपुस्तकात स्वाध्यायात विद्यार्थ्यांनी करावयाचे पुरवणी वाचन त्यांचा वर्ग, वय, बौध्दिक क्षमता यांचा विचार करून दिलेले असते. कथा, कांदबरी, चरित्र, आत्मचरित्र इत्यादी साहित्य प्रकारांचा समावेश यात असतो. प्रत्येक इयत्तेनिहाय पुरवणी वाचनासाठींच्या किती पुस्तकांचे वाचन अपेक्षित आहे याची नोंद अभ्यासक्रमात आहे.
वार्तालाप में शामिल हों