परिसंवाद तंत्र - Symposium Techniques
परिसंवाद तंत्र - Symposium Techniques
परिसंवाद पद्धती ही विद्यार्थी केंद्रित आधुनिक शिक्षण पद्धती आहे. या पद्धतीत विद्यार्थी स्वःत बोलतो, ऐकतो, विचार व्यक्त करतो, सहभाग घेतो. परिसंवादातील विचारविनियामुळे स्व:तचे विचार व्यक्त करणे व दुसऱ्याचे विचार ऐकणे या दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडतात. या पद्धतीत विद्यार्थी व शिक्षक आणि परस्पर विद्यार्थ्यात आंतर्क्रिया घडत असते, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वासाठी उपयुक्त ठरते. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा समग्र विकास घडवून आणण्यास ही पद्धती उत्तम आहे. चर्चेचा उत्तम पर्याय म्हणून परीसंवादाकडे बघितले जाते. उच्च वयोगटातील विद्यार्थ्याकरिता ही पद्धत योग्य व उपयुक्त आहे.
परिसंवादाचा अर्थ :
“दोन ते चार व्यक्तींनी एखाद्या विषयासंबंधी भिन्न-भिन्न दृष्टीकोन असलेली मते संक्षिप्त भाषेत मांडणे व त्यावर चर्चा करणे, याला परिसंवाद म्हणतात."
परिसंवाद पद्धती :
परिसंवादाकरिता विद्यार्थ्यांच्या आवश्यकतेनुसार व आवडीनुसार विषयाची निवड करावी. निवडलेल्या विषयाची विविध आंगोपांगाची विभागणी करून चर्चेकरिता विविध मुद्यांची यादी तयार करावी. निवड केलेल्या विषयाची चर्चेकरिता मुख्य मुद्यांची मांडणी करावी. मुद्यांवर एकेक विद्यार्थ्याला चांगली तयारी करावयास सांगावे. संदर्भ पुस्तके, मासिके, वृत्तपत्र याचा उपयोग मुद्याच्या तयारीकरिता करावा. शिक्षकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांकरिता अत्यंत उपयुक्त आहे. योग्य नियोजन परिसंवादाच्या यशस्वितेकरिता महत्वाचा घटक आहे. परीसंवादाकरिता निवड केलेल्या विषयाच्या मुद्यांची तयारी केलेले विद्यार्थी मुद्यांची मांडणी करतील, इतरांच्या प्रश्नाचे - शंकाचे निरसन करतील. या प्रसंगी विद्यार्थी शिक्षकांचे सहकार्य ही घेतील. परिसंवाद पद्धतीच्या सहाय्याने एखाद्या विषयावर सांगोपांग चर्चा घडवून आणता येते. संत साहित्य, दलित साहित्य, ललितनिबंध या साहित्य प्रकाराकरिता परिसंवादाचे उत्तम आयोजन करता येते. परिसंवाद पद्धतीचे गुणदोष पुढीलप्रमाणे सांगता येतील.
वार्तालाप में शामिल हों