वाक्यारूपांतर मिश्र - syntactic mix
वाक्यारूपांतर मिश्र - syntactic mix
समास- द्वंद्व (समाहार, इतरेतर वैकल्पिक) सहबहुव्रीही, कर्मधारय,
लेखन नियामानुसार- मराठी साहित्य महामंडळाने सम्मत केलेले शुद्ध वाक्यलेखन नियम पाठ्य पुस्तकात परिशिष्टामध्ये दिलेले आहेत-
1) अभ्यासक्रम उद्दिष्टाक्रम असावा
अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 नुसार उद्दिष्टांची व अभ्यासक्रमाची पुनर्रचना केली. अभ्यासक्रम तयार करतांना सर्वप्रथम उद्दिष्टेच ठरवावी लागतात. त्यामुळे अभ्यासक्रम हा उद्दिष्टांनुरूप असायला हवा. आणि तो आहेही. विद्यार्थ्यांचे इयत्ता 11 वी वर्यंत मराठी भाषा व साहित्यांचे जे अध्ययन झाले आहे ते विचारात घेऊनच अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात आली आहे आणि हे करतांना प्राचीन आधुनिक काळातीत मराठी साहित्याचा प्रातिनिधिक परिचय व्हावा.
विविध वाङ्मयीन प्रवाह प्रवृती यांचे आकलन व्हावे याची दक्षता अभ्यासक्रम ठरवितांना घेतली गेली आहे साहित्याच्या वाचनातून विद्यार्थ्यांना ज्ञानप्राप्ती बरोबरच आनंद प्राप्तीही व्हावी, समकालीन जीवनातील प्रश्नांची जाणीव होऊन त्यांच्या ठायी निकोप सामाजिक दृष्टी व शब्दप्रेम निर्माण व्हावे, त्यांच्यातील साहित्यादी कलांचा आस्वाद घेण्याची क्षमता व चिंतनशीलता विकसित व्हावी. त्यांच्यातील कलानिर्मिती प्रेरणेचे पोषण व्हावे आणि श्रेष्ठ जीवनमूल्यांचा संस्कार होऊन त्यांचे व्यक्तिमत्व समृद्ध व्हावे ही सगळी उद्दिष्टे अभ्यासक्रमातून साध्य होतांना दिसतात.
2) अभ्यासक्रम म्हणजे केवळ नियुक्त विषय, त्यातील निवडक आशय व त्यावरील पाठ्यपुस्तक
असे नव्हे तर विषयांतर्गत व विषयबाह्य अशा सर्वच अनुभवांचा अभ्यासक्रमांत अंतर्भाव असावा - 12 वी चा विद्यार्थी हा वास्तववादी झालेला असतो त्याची अमूर्त त्याची अमूर्त पातळीवर विचार करण्याची क्षमता वृद्धिंगत झालेली आहे.
आणि याच दृष्टिकोणातून विद्यार्थ्यांमध्ये वाङ्मयीन दृष्टि निर्माण व्हावी, अलंकारिक भाषेने फुलविलेले प्रसंग त्याला अनुभविता यावे, बोलीतील जिवंतपणा अलपाक्षरत्व व शब्दांची लय ह्या वैशिष्ट्यांचे दर्शन नैतिक मूल्यांचे संस्कार व्हावेत सांस्कृतिक इतिहासाचा वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, स्वातंत्र्य, समता, बंधुता इ. जीवनमूल्यांचे विद्यार्थ्यावर संस्कार व्हावेत सामाजिक जाणीव निर्माण विद्यार्थ्यांना तर्कशुद्ध अनुमान करता यावे मराठी भाषा व संस्कृती विषयी अभिमान निर्माण व्हावा, नव्या जीवनमूल्यांचे दर्शन व्हावे विद्यार्थ्यांमध्ये भावनिष्पत्ती व्हावी, थोर व्यक्तींचा जीवनपरिचय व्हावा, ग्रामीण बोलीचा परिचय व्हावा साहित्याच्या कलात्मकतेचे ज्ञान व्हावे, अध्यात्मिक संस्कारांची जडणघडण व्हावी, पांडित्य व रसिकता यांच्या सुरेख संगमाचा परिचय विद्यार्थ्यांना व्हावा, राष्ट्रप्रेम विद्यार्थ्यांमध्ये जागृत व्हावे अशा विविध बाजूनी विद्यार्थ्याचा विचार अभ्यासक्रमातून केल्या गेलेला आहे. म्हणजेच केवळ पाठ्यपुस्तक नव्हे तर विषयबाह्य अनुभवांचा जे की त्यांच जीवनात आवश्यक आहेत त्यांचाही विचार अभ्यासक्रमातून यथायोग्यपणे करण्यात आलेता आहे. तद्वतच पत्रलेखन, कार्यालयीन टिप्पणी, जाहिरात हे लेखन प्रकार अभ्यासक्रमात समाविष्ट केल्याने विद्यार्थ्यांचे विषय बाह्य अनुभव ही विस्तृत होण्यास मदत होईल.
3) अभ्यासक्रम पुस्तकी नसावा त्यात क्रियाशीलता असावी
ह्या तत्वानुसार निबंधलेखन, सारांश लेखन, आकलन, लेखन, भाषांतर असे विविध लेखनप्रकार अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेले आहेत की ज्यामूळे विद्यार्थ्याच्या कृतीशीलतेला व त्याबरोबरच सृजनशीलतेला वाव मिळावा प्रश्न मात्र पाठ्यपुस्तकात समाविष्ठ नाही ह्याचे कारण विविध वाङ्मयीन दृष्टिकोणातून विद्यार्थाना विचार करता यावा.
4) अभ्यासक्रमातून विषयांशी समवाय साधला जावा
अभ्यासक्रमातून विषयांशी समवाय देखील साधला गेलेला आहे.
वसईचा वेढा (बखर) - इतिहास
उदा. स्वामीचे मांडीवर उसे इतिहास भारतीय शेतीपुढील आव्हाने अर्थशास्त्र
बंधअनुबंध समाजशास्त्र
दर्शन- तत्त्वज्ञान
समवाय केवळ विषयांशीच नव्हे तर जीवनतल्या वास्तववाशी देखील साधल्या गेलेला आहे. जो की या स्तरावरील विषयांशीच आवश्यक आहे.
उदा. बेगड, झोंबी इ.
माध्यमिक स्तारवरील पाठ्यक्रमाचा अभ्यासक्रमाच्या तत्त्वानुसार अभ्यास.
5) विद्यार्थ्यांवर विषयांचा जास्त बोजा पडू नये -
12 वी च्या विद्यार्थ्याचा स्तर उंचावलेला असतो, व्यवहारातील सर्वसाधारण पातळीवर माध्यमिक स्तरातून से पोहोचलेले असतात. त्यामुळे विषयांचे विस्तृत ज्ञान व्हावे.
जे की त्यांच्या व्यवसायाच्या, त्यांच्या अर्थाजनाच्या दृष्टिने उपयोगी पडेल याचदृष्टिने अभ्यासक्रमाची रचना केलेली आहे. आणि म्हणूनच 12 वी च्या विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य दिलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्याला आपल्या आवडीचे विषय निवडता येतात व त्यांना जे अनावश्यक वाटतात त्या विषयांचा बोजा त्यांच्यावर साहजिकच पडत नाही.
6) अभ्यासक्रम शहरी व ग्रामीण विभागासाठी असावा
महाराट्रातील कनिष्ठ महाविद्यालयातून अध्यापन घेतांना सुसूत्रता यावी समपातळी यावी हे महत्त्वपूर्ण उद्दिष्टच मुळी अभ्यासक्रमाच्या मुळाशी आहे आणि शिवाय सर्व साहित्य प्रकाराची ओळख व्हावी या हेतुने वैचारिक निबंध, आत्मचरित्र कादंबरीतील उतारा, माहनुभवीय गद्य प्रकार, पंडिती काव्य इ. विविध प्रकारच्या साहित्याची निवड अभ्यासक्रमांत केलेली आहे. जी की वाङ्मयीन उद्दिष्टे परिपूर्ण करण्यात आवश्यक आहेत. त्यामुळे अभ्यासक्रम शहरी व ग्रामीण विभागासाठी वेगवेगळा ठेवणे शक्य नाही.
(7) अभ्यासक्रमात अभ्यासपूरक कार्यक्रमांनाही स्थान असावे -
याच दृष्टिकोणतून, निबंध लेखन, सारांश लेखन, भाषांतर इ. लेखन प्रकाराला अभ्यासक्रमांत स्थान दिले गेलेले आहे.
8) व्यक्तीला यशस्वी जीवन जगता यावे असे किमान शिक्षण अभ्यासक्रमातून मिळावे -
याचाच अर्थ जीवन व शिक्षण यांचा संबंध प्रस्थापित व्हावा. हेही तत्त्व साध्य होतय. किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम तयार केले गेले आहेत. मातृभाषेच्या अभ्यासक्रमातून विद्यार्थी योग्य प्रकारे कार्यालयीने पत्रव्यवहार, आवेदन-पत्र भरणे, आपली मते थोडक्यात मांडणे, जाहिरात तयार करणे असे विविध प्रकार शिकतो त्याचा त्याला जीवनांत निश्चितच उपयोग होतो.
9) अभ्यासक्रम लवचिक, बदलता व गतिमान असावा
हे तत्त्व पाळणे आवश्यक असते कारण उदयोन्मुख समाजातील गरजांनुसार अभ्यासक्रम हा बदलतोच नवनवे शिक्षण आयोग स्थापन झालेत ते एवढयाच साठी. 1986 च्या नवीन शैक्षणिक धोरणा प्रमाणे तो आता बदलेला आहे. गरजा बदलल्या की उद्दिष्टे बदलतात, उद्दिष्टे बदलती ही अभ्यासक्रम बदलणे क्रमप्राप्त ठरते.
10) अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांच्या विकासाच्या अवस्थांना अनुकूल असावा
12 वी चा मातृभाषेचा अभ्यासक्रम विद्यार्थ्याच्या विकासाच्या अवस्थांना निश्चितय अनुकूल आहे. विद्यार्थ्यामध्ये एक प्रकारची वास्तववादी दृष्टी या अवस्थेत निर्माण झालेली असते.
जीवन व शिक्षण यांना जोडणे या स्तरापासूनच सुरू होते. अभ्यासक्रमातून या सर्व गोष्टींचा सारासार विचार केलेला दिसून येतो. विद्यार्थ्याच्या व्यक्मित्व विकासाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न अभ्यासक्रमातून निश्चित साध्य होईल असे वाटते.
11) मातृभाषेच्या माध्यमातून नैतिक मूल्ये, ऐतिहासिक जाणीव, सामाजिक जाणीव, जीवनविषयक दृष्टिकोण निर्माण व्हावा -
या दृष्टिने अभ्यासक्रमांतील वेच्यांच्या आधारावर यातील प्रत्येक घटकाला योग्य स्थान अक्षरे अभ्यासक्रमातून पाठ्यपुस्ताकाच्या आधारे दिले गेले आहे. उदा. बखर गद्य, स्वामींचे मांडीवर उसे, सत्य, मोठ्या दिलाचा राजा, गठण्याआधी चुरगाळिता (पद्य) (पद्य).
तात्पर्य 12 वी चा मातृभाषेचा प्रचलित अभ्यासक्रम मातृभाषेच्या अभ्यासक्रमाच्या तत्वावरच आधारित आहे. पण मागे सांगितल्या प्रमाणेच अभ्यासक्रम तयार करणे व तो राबविणे यात अंतर पडते. अभ्यासक्रमाची यशस्विता तो कसा राबविला जातो त्यावर अवलंबून आहे. म्हणून विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व सर्वगामी करण्याची जबाबदारी शिक्षकावर येऊन पडते. शिक्षकाने जर आपली जबाबदारी ओळखून स्वतः पूर्णपणे तयारीने अभ्यासक्रम राबविला तर विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व सर्वगामी, सर्वस्पर्शी झाल्याशिवाय रहाणार नाही.
वार्तालाप में शामिल हों